घरट्रेंडिंगसहा वर्षांच्या रायनचे 'वॉलमार्ट'मध्ये खेळण्याचे दुकान

सहा वर्षांच्या रायनचे ‘वॉलमार्ट’मध्ये खेळण्याचे दुकान

Subscribe

२०१५ सालापासून रायनचा युट्युब व्हिडिओचा प्रवास सुरु झाला. अवघ्या ३ वर्षांचा असल्यापासून त्याने टॉय रिव्ह्यूला सुरुवात केली. आता तो ६ वर्षांचा असून त्याचे १५ मिलियनवर सबस्र्काईबर आहेत.

वय अवघं सहा वर्ष पण या इतक्या लहान वयात युट्युबचा स्टार बनलेला हा लिटील स्टार अनेकांना माहित असेल. बाजारात कोणतेही नवे खेळणे आले की, रायनचा रिव्ह्यू व्हिडिओ पाहायलाच हवा. त्यामुळेच जगभरात रायनचे फॉलोअर्स आहेत. आता एक पाऊल पुढे टाकत रायन युट्युब स्टारवरुन  लवकरच सगळ्यात लहान बिझनेसमन अशी ओळख निर्माण करणार आहे. कारण आज अमेरिकेतील वॉलमार्टच्या २ हजार ५०० दुकानांमध्ये रायनचे टॉय शॉप सुरु झाले आहे.

- Advertisement -

(सौ. रायन फॅमिली रिव्ह्यू)

वेबसाईड आणि खेळण्याचे दुकान

रायन्स वर्ल्ड या नावाने रायनचे हे टॉय कलेक्शन असणार आहे. दुकानासोबत त्याच्या वेबसाईटचे अनावरण आज झाले. रायनच्या वेगवेगळ्या खेळण्यांची हे दुकान सजलेले आहे. विशेष म्हणजे या दुकानाचे नुसते नाव रायन वर्ल्ड असे नाही तर यातील खेळण्यांचे डीझाईन रायनच्या असून त्याच्या संकल्पनेतून ही खेळणी तयार करण्यात आली आहेत. त्याने कालच या संदर्भातला एक व्हिडिओ त्याच्या युट्युब चॅनेलवरुन शेअर केला आहे. ज्यात तुम्हाला या नव्या डीझाईन्स दिसू शकतात. तर वॉलमार्टमधील काही खेळण्यांचा व्हिडिओ त्याने आज केला आहे.

- Advertisement -

(वेबसाईट आणि दुकानच्या अनावरणाच्या एक दिवस आधी अपलोड केलेला रायनचा व्हिडिओ, सौ. रायन्स टॉय रिव्ह्यू) 

अन्य कलेक्शनही उपलब्ध

रायन वर्ल्डच्या या कलेक्शनमध्ये 3 वर्षांवरील मुलांसाठी टि-शर्ट कलेक्शन असणार आहे. ज्याचे डिझाईन्स रायनच्या आवडीनुसार करण्यात आले आहेत.

 

युट्युबपासून झाली सुरुवात

२०१५ सालापासून रायनचा युट्युब व्हिडिओचा प्रवास सुरु झाला. अवघ्या ३ वर्षांचा असल्यापासून त्याने टॉय रिव्ह्यूला सुरुवात केली. आता तो ६ वर्षांचा असून त्याचे १५ मिलियनवर सबस्र्काईबर आहेत. तर त्याच्या व्हिडिओला १ हजार कोटींच्या घरात व्ह्यूज आहेत. खेळण्यांचे रिव्ह्यू देणारे अनेक युट्युबर असले तरी त्यात रायनचे नाव अग्रकमावर आहे. हायेस्टपेड युट्युबरमध्ये त्याचा ८ वा क्रमांक आहे. रायन या त्याच्या नावाव्यतिरिक्त त्याची अन्य कोणतीही माहिती त्याच्या चाहत्यांना माहिती नाही. त्याचे युट्युबवर ६ चॅनेल्स आहेत.

 

(2 वर्षांचा रायन सौ. रायन्स टॉय रिव्ह्यू )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -