घरट्रेंडिंगसमाज परिवर्तनाची नितांत गरज; सोनाली दळवी Facebook Live!

समाज परिवर्तनाची नितांत गरज; सोनाली दळवी Facebook Live!

Subscribe

तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सोनाली दळवी यांनी आपल्या समाजाच्या समस्या आणि त्यांना मिळणारी वागणूक यावर परखड मतं मांडली.

तृतीयपंथी असतानाच आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे ठामपणे सांगणारी सामाजिक कार्यकर्त्या, तृतीयपंथी सोनाली दळवी हिने माय महानगर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समाजाबाबतचे समज-गैरसमज दूर केले आहेत. तृतीयपंथीचे प्रश्न, समस्या या विषयांवर सातत्याने काम करणारी सोनाली नुकत्याच सुप्रीम कोर्टाने कलम ३७७ बाबत दिलेल्या निर्णयावर कृतज्ञता व्यक्त केली आहे. उशीरा का होईना कोर्टाने आम्हाला न्याय दिला ही भावना तिने व्यक्त केली आहे. हा केवळ पहिला टप्पा असून पुढे आपल्या समाजासाठी मोठी लढाई लढायची असल्याचे सोनाली सांगते.

पाहुया सोनालीची संपूर्ण मुलाखत …

- Advertisement -

सरकारकडून पैसे नको, रोजगार हवा

आपल्या कुटुबियांच्या पाठींब्यामुळे सोनालीला चांगले शिक्षण, चांगली वागणूक मिळाली. मात्र हे सर्वच तृतीयपंथींच्या बाबतीत होत नाही. त्यांच्यासाठी सोनाली विविध सामाजिक उपक्रम राबवते. लोकांना भेटते. पालकांचे समुपदेशन करते. समाज परिवर्तनासाठी लढा देत आहे. सरकारकडून आम्हाला पैशाची नाही, तर आमच्या अधिकारांची मागणी सोनाली करत आहे. आम्हाला रोजगार द्या, आमच्या पायावर उभं राहण्याची संधी द्या. भीक मागणे, नाच-गाणं करणे, सेक्स वर्क करणे या कामातून मुक्तता द्या, अशी मागणी या माध्यमातून सोनालीने सरकारकडे केली आहे. स्त्री-पुरुषांच्या या जगात आमचही अस्तित्व आहे, असं ठामपणे सांगणारी सोनाली दळवी हे बोलताना अनेक तृतीयपंथीयांमध्ये आत्मविश्वास जागृत करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -