घरट्रेंडिंगएक दिवस होणार २५ तासांचा?

एक दिवस होणार २५ तासांचा?

Subscribe

‘दैनंदिन कामाच्या व्यापामुळे २४ तास सुद्धा कमी पडतात’, असं आपण अनेकदा म्हणतो. ‘आणखी थोडा वेळ मिळाला असता’ किंवा ‘आजचा दिवस थोडा मोठा असता तर..’ असं अनेकदा वाटतं. समजा खरोखरच एक दिवस २५ तासांचा झाला तर? रोजच्या २४ तासांच्या दिवसात आपल्याला १ तास बोनस मिळाला तर? तज्ज्ञ म्हणतात, की लवकरच पृथ्वीवरचा एक दिवस २५ तासांचा होणार आहे.

चंद्रामुळे होतंय सगळं…

तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार लाखो वर्षांपासून पृथ्वीवरील प्रत्येक दिवस हळूहळू मोठा होतो आहे. याला कारणीभूत आहे पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार साधारणपणे १.४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दिवस केवळ १८ तासांचा होता. त्यावेळी पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर कमी होते. त्यामुळे पृथ्वीची फिरण्याची गतीसुद्धा जास्त होती. मात्र, गेल्या काही वर्षात पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर होतो आहे.

- Advertisement -
तज्ज्ञांनी उलगडलं गुपित

पृथ्वीवर घडणाऱ्या भौगोलिक घटनांमध्ये पृथ्वी आणि चंद्रामधील गुरुत्वीय बलाचा परिणाम असल्याचे याआधी संशोधनातून समोर आले आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षांत पृथ्वीवरच्या एका दिवसाचा कालखंड चंद्रामुळेच बदलला असल्याचे सिद्ध झाले आहे. याविषयातील तज्ज्ञ प्रा. स्टीफन मेयर्स यांनी यासंबंधीचा एक विशेष अहवाल मांडला आहे. या अहवालामध्ये मेयर्स म्हणतात, की पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या प्रक्रियेमध्ये चंद्रासोबतच सूर्यमालेतील इतर ग्रह आणि अन्य काही घटकांचाही परिणाम होत असतो. यावरुनच पृथ्वीचा आस निश्चित होत असतो. अहवालातील ताज्या आकडेवारीनुसार दरवर्षी चंद्र पृथ्वीपासून २.८२ सेंटिमीटरने दूर जातो आहे. साधारणपणे १.५ अब्ज वर्षांपूर्वी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर खूप कमी होते. त्यामुळे दोघांमधील गुरुत्वीय शक्तीचा परिणाम पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यावर जाणवत होता. मात्र, जसजसे पृथ्वी आणि चंद्रातील अंतर वाढत गेले, तसतसा पृथ्वीला फिरण्यासाठी वेळ वाढू लागला. त्यामुळे पृथ्वीवरील १८ तासांचा एक दिवस कालांतराने २४ तसांचा झाला.

तज्ज्ञांच्या संशोधनानुसार, चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर सातत्याने वाढत जाणारे आहे आणि ही प्रक्रिया अटळ आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांतच पृथ्वीवरील एक दिवस २५ तासांचा होणार असल्याचा अंदाज संशोधक वर्तवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -