Good News : मान्सून अंदमानात दाखल

Pune
monsoon in andaman

दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळत असताना मान्सूनची सर्व चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. ग्रामीण भागासहीत शहरी भागात देखील ऊन्हाचा पारा चढल्यामुळे सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहे. मात्र आता एक आनंदाची बातमी पुणे वेधशाळेतून येत आहे. मान्सून आज (ता. १८) अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात पोहोचला आहे. हवामान खात्याकडून दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग नैऋत्य मोसमी वाऱ्याने ( मॉन्सून) व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here