Video: जीव वाचवण्यासाठी म्हशीने मारली सिंहांच्या अंगावरून उडी!

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.

Mumbai
survival of the fittest video when lions attack on a buffalo viral video
Video: जीव वाचवण्यासाठी म्हशीने मारली सिंहांच्या अंगावरून उडी!

जेव्हा मृत्यू मागे असतो, तेव्हा जिवंत राहण्यासाठी आपल्याकडे अफाट शक्ती निर्माण होते. मग ते जंगलातले प्राणी असो वा माणसं. असेच काहीसे या व्हिडिओमधील म्हशीसोबत घडले आहे. या व्हिडिओमधील म्हशीची जगण्याची धडपड पाहून तुम्ही थक्क व्हाल. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सिंहांच्या कळपातून आपला जीव वाचवण्यासाठी म्हैस जोरात पळताना दिसत आहे. नदी किनारी एका जंगली म्हशीला जवळपास तीन सिंहांनी वेढा घालतला आहे. जेव्हा ते सिंह म्हशीवर हल्ला करतात तेव्हा तिने चक्क त्यांच्या अंगावरून उडी मारून पळ काढला आहे. पूर्ण ताकद लावून ती धावताना दिसत आहे.

आईएफएस सुशांता नंदाने हा व्हिडिओ शेअर केला असून आतापर्यंत त्याला ५४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सुशांता नंदाने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, ‘सिंहानीही या जबरदस्त उडीचा अंदाज लावला नसेल. त्यासोबत सिंहाची शिकार सफल होण्याचा दर ३० टक्के आहे.’

 

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घालत आहे. या जीवघेण्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊन अनेक लोक सध्या सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत.


हेही वाचा – शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक आला शेतकर्‍यासमोर अन…