‘सुशांत-दिशाच्या हत्येचे ‘डार्क वेब’द्वारे लाईव्ह टेलिकास्ट झाले होते’, वकीलाचा दावा

sushant suicide cbi investigation case why disha salian phone was active after her death
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मागच्या तीन महिन्यांपासून टीव्ही आणि इतर माध्यमांवर केवळ सुशांत आणि त्याच्याशी निगडीत इतर विषयांनी ताबा मिळवला आहे. कोरोना, ढासळलेली अर्थव्यवस्था, घसरता जीडीपी, वाढती बेरोजगारी यावर ना सरकारी पातळीवर गांभीर्य दिसत आहे, ना जमिनीस्तरावर. त्यातच सुशांत, रिया आणि कंगनाला घेऊन रोज काही ना काही नवे दावे समोर येत असतात. असाच एक खळबळजनक आणि आश्चर्यकारक दावा एका वकिलाने केला आहे. सुशांत, दिशा सालियन यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचे या वकिलाने सांगतिले आहे. एवढेच नाही तर दोघांच्याही हत्येचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले होते, असाही दावा त्याने केला आहे. या वकिलाचे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

वकील विभोर आनंद याने ९ सप्टेंबर रोजी एक ट्विट केले होते. याबद्दल बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने बातमी दिली आहे. “सुशांत सिंह राजूपत, दिशा सालियन आणि एका अल्पवयीन मुलीचा खून करुन त्याचे डार्क वेबद्वारे जगभरात लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले होते. त्यामुळेच मृत्यूपुर्वी सुशांतला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होते. संबंध बॉलिवूड त्याच्या मरणाचा आनंद घेत होते.” असे ट्विट विभार आनंदने केले आहे.

आनंद विभोरच्या या ट्विटनंतर सुशांतच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ आता जगासमोर आणण्याची मागणी केली आहे. तर हा दावा खोटा वाटणाऱ्यांनी आनंद विभोरला ट्रोल केले आहे. फक्त ट्विट करुन अर्धसत्य सांगण्यापेक्षा तो व्हिडिओ पोलीस किंवा सीबीआयकडे का दिला नाहीस? असा सडेतोड प्रश्न देखील या ट्विटखाली अनेकांनी विचारला आहे. तर काहींनी विभोरची खिल्ली उडवली आहे.

काही घनचक्कर लोकांनी तर दिशा आणि सुशांतच्या आत्म्याशी बातचीत केल्याचा दावा केला आहे. हे ट्विट वाचून असे कळते की एकतर या लोकांनी उपरोधिकपणे आनंद विभोरवर टीका केलीये किंवा ते देखील प्रसिद्धीच्या लालसेपोटी असे अचाट दावे करत आहेत.

 

ट्विटरवर काही सजग मंडळी देखील आहेत ज्यांनी अशाप्रकारचे असत्य पसरवू नये, अशी विनंती केली आहे. या अशा अचाट दाव्यांमुळे सुशांतच्या परिवाराला मनस्ताप होत असेल. जर तुमच्याकडे खरंच काही पुरावे असतील तर ते सीबीआयकडे सुपुर्द करावेत. मात्र मृत्यूनंतर अशापद्धतीने कुणाची थट्टा करु नये, अशा शब्दात काही ट्विटर युजर्सनी सुनावले आहे.

डार्क वेब काय असतं?

डार्क वेब ही इंटरनेटवरील काळे जग आहे. Quora या संकेतस्थळावर एका युजरने याबाबत माहिती दिली आहे. ज्याप्रकारे सामान्य लोक सोशळ नेटवर्किंग किंवा विकिपिडिया सारख्या साईट्सना भेट देत असतात. तसेच जगातील बदमाश मंडळी डार्क वेबच्या माध्यमातून ड्रग्ज, लहान मुलांची तस्करी, वेश्याव्यवसाय सारखे काळे धंदे करत असतात. आपण वापरत असलेल्या इंटरनेटमध्ये कितीतरी डीप वेब आहे. ज्याचा शोध गुगलसारख्या सर्च इंजिनवर घेता येत नाही. डार्क वेब हे कोणत्याही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही. त्यामुळे इथे बेकायदेशीर कृत्यांचा उद्योग सुरु असतो.