टाटा मोटर्सचा शेअर बाजाराला ‘दे धक्का’!

सेन्सेक्स तब्बल ४२४.६१ अंकांनी कोसळला

Mumbai
Share market down
प्रातिनिधिक छायाचित्र

टाटा ही कंपनी शेअर बाजारातील बिग प्लेअर मानली जाते. मग टाटा मोटर्स असो की टाटा फायनान्स. त्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री सेन्सेक्स, निफ्टीचे भवितव्य ठरवते. काल शेअर बाजारात त्याचा प्रत्यय आला. टाटा मोटर्सचे शेअर्स, मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गडगडले आणि मोठा धक्का बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक, सेन्सेक्स तब्बल ४२४.६१ अंकांनी (१.१५ टक्के) खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक, निफ्टीत  १२५.८० अंकांची (१.१४ टक्के) घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे ३६,५४६.४८ आणि १०,९४३.६० अंकांवर स्थिरावले.

मुंबई शेअर बाजारातील ३१ कंपन्यांपैकी २६ कंपन्यांचे शेअर्स लाल चिन्हांकित होते. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० कंपन्यांपैकी ४१ कंपन्या लाल चिन्हांकित होत्या. यावरून बाजारात काय हाहा:कार मजला याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

शुक्रवारी टाटा मोटर्सचे तिमाही निकाल कमजोर आले. त्यामुळे दोन्ही बाजारांमध्ये टाटा मोटर्सचे शेअर्स तब्बल १७ टक्क्यांनी खाली आले. टाटा मोटर्सच्या शेअर्सची सेन्सेक्समध्ये १७.२८ टक्के तर निफ्टीमध्ये १७.८८ टक्क्यांची घसरण झाली होती. याशिवाय मुंबई शेअर बाजारात  टाटा मोटर्स डीवीआर (१२.७७ टक्के), वेदांता (५.७५ टक्के), टाटा स्टील (३.७० टक्के), ओएनजीसी (२.९४ टक्के), इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स (६.९१ टक्के), ग्रासिम (५.०८ टक्के), आयशर मोटर्स (४.९९ टक्के) आणि इंडियन ऑईल्स (३.३३ टक्के)यांचे शेअर्स खाली आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here