टाटाची हॅरियर गाडी २३ जानेवारीला बाजारात

Mumbai
टाटाची हॅरियर ही गाडी

टाटाची हॅरियर ही गाडी लवकरच बाजारात येणार आहे. देशात एसयूव्ही गाड्यांच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांची आवड लक्षात घेऊन टाटाने हॅरियर ही गाडी बाजारात आणण्याचे ठरवले आहे. या गाडीला एसयूव्ही इंजिनसह स्पोर्ट्स लूक दिला आहे. ही गाडी टाटाने २०१८ सालच्या ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदा दाखवण्यात आली. तेव्हापासून या गाडीबाबत लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. या गाडीला लॅण्ड रोव्हर डी-८ मध्ये असलेले आणि जग्वार लॅण्ड रोव्हरच्या साथीच्या विकसित केलेले ऑप्टीमल मॉड्युलर इफिशिएंट ग्लोबल अ‍ॅडव्हान्स ऑर्किटेक्चरचा टच देण्यात आला आहे. टाटा मोटर्स आणि जॅग्वार लँड रोव्हर यांनी ही कार डेव्हलप केली आहे. हॅरियर गाडीची डिझाइन अपारंपरिक पद्धतीचे असले तरी तरुणांना त्याची अगोदरच भूरळ पडली आहे. त्यामुळे आतापासूनच देशातील तरुणाई या गाडीच्या प्रेमात आहे. येत्या २३ जानेवारी रोजी भारतामध्ये ही गाडी लाँच होणार आहे.

या गाडीचा व्हॅलीबेस मोठा आहे. त्यामुळे मागच्या सीटवर मोठी जागा उपलब्ध होणार आहे. तसेच सपाट सीट असल्यामुळे या भागात तीन जण अगदी सहज बसू शकणार आहेत. गाडीची ठेवण ही लँड रोव्हरच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली असल्यामुळे गाडीला लँड रोव्हरचा फिल आहे. थर्मिस्टो गोल्ड, कॅलिस्टो कॉपर, एरियल सिल्व्हर, टेलिस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट अशा पाच रंगात ही गाडी उपलब्ध होणार आहे.

गाडीत सिटबेल्ट रिमाइंडरसह 3-पॉइंट सिटबेल्ट्स देण्यात आले आहेत. या एसयूव्हीमध्ये अनेक शानदार फिचर्स आहेत. फॉलो-मी-होम फंक्शनसह प्रोजेक्टर लेंस हेडलॅम्प्स, एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स, फॉग लॅम्प, एलईडी टेललाइट्स आणि आऊट साइड व्ह्यू मिररमध्ये टर्न इंडिकेटर्स आहेत. या गाडीची किंमत रजिस्ट्रेशन खर्च, विमा आणि इतर करांशिवाय १६ ते २१ लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here