Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग कॅबमध्ये प्रवाशाने मास्क लावण्यास दिला नकार, चालकाने शिकवला चांगलाचं धडा

कॅबमध्ये प्रवाशाने मास्क लावण्यास दिला नकार, चालकाने शिकवला चांगलाचं धडा

Related Story

- Advertisement -

संपूर्ण २०२० हे वर्ष कोरोना व्हायरसच्या संकटात गेले. या जीवघेण्या व्हायरसमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. काही देशांची अर्थव्यवस्था कोलमंडली आहे आणि हजारो लोक मानसिक समस्यांचा सामना करत आहेत. अशी परिस्थितीत असूनही अनेक लोकं कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करताना दिसत नाही आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळण्याचे अनेक लोकांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान एका कॅब चालकाने एका प्रवाशाला लॉकडाऊनचा नियम न पाळल्यामुळे चांगलाच धडा शिकवला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका प्रवाशाला मास्क घालायला सांगितला. पण त्याने मास्क घालण्यास नकार दिला आणि कॅब चालकाने थेट त्याला पोलिस ठाण्यात पाठविले. ही घटना कॅनडामध्ये घडली आहे.

कॅनडामधला एक व्यक्ती न्यू इअरच्या सेलिब्रेशनमध्ये एन्जॉय करून मद्यधुंद अवस्थेत कॅबमध्ये बसला. तेव्हा कॅब चालकाने त्याला मास्क लावण्यास सांगितले पण मास्क घालण्यास नकार दिला. ज्यानंतर कॅब चालकाने प्रवाशाच्या जाण्याच्या ठिकाणी न सोडता सरळ त्याला पोलिस ठाण्यात सोडले. याशिवाय कॅब चालकाने ९११ वर फोन लावला आणि सांगितले की, एक व्यक्ती गाडीत विना मास्क प्रवास करत आहे. हा प्रवाशी मद्यधुंद अवस्थेत होता. त्यावेळेस तो जाणूनबुजून कोरोनाचे नियम तोडण्यासाठी चालकाच्या तोंडाला सतत हात लावण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे चालकाने थेट विक्टोरिया पोलिस डिपार्टमेंट हेडक्वार्टर्समध्ये त्याला पाठवले.

- Advertisement -

यादरम्यान तो प्रवाशी गाडीतून उतरत नव्हता, परंतु पोलिसांच्या समोर त्याचा हा प्रकार चालला नाही आणि त्याला पोलिसांनी अटक केली. या व्यक्तीवर ६९० डॉलर म्हणजे जवळपास ५० हजार रुपयांचा दंड लावला आहे.


हेही वाचा – आता बस्स झाला कोरोना, कपल्स कोरोनाला वैतागून मेट्रोतच Kiss करत सुटले


- Advertisement -

 

- Advertisement -