Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग इथे मिळतो पत्नीपीडित पतींसाठी मोफत चहा; प्रेमीयुगुलांसाठीही Special Item

इथे मिळतो पत्नीपीडित पतींसाठी मोफत चहा; प्रेमीयुगुलांसाठीही Special Item

प्रेमात धोका मिळालेल्यांसाठी अनेक प्रकारचा चहा

Related Story

- Advertisement -

आपलं उत्पादन इतर व्यवसायिकांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येक दुकानदाराला वाटतं असतं. असंच काहीसं चहाच्या कित्येक दुकानांच्या बाबतीत आपल्या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं. प्रेमाचा चहा, आपुलकीचा चहा, मैत्रीचा चहा विवध नावांचे अमृततुल्य असे कित्येक चहाचे दुकान तुम्ही पाहिले असेल. मात्र तुम्ही प्रेमात धोका मिळालेल्यांसाठी ‘कालू बेवफा चाय वाला’ हे नाव ऐकलंय का? नाही नं… तर जाणून घेऊया सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या चहावाल्याविषयी…

कोणताही प्रसंग असो चहाप्रेमींना एक कटिंग हवाच असतो. आपला चहा आपल्या ग्राहकांसाठी खास असावा असे प्रत्येक दुकानदाराला वाटत असते. सध्या व्हायरल एक आगळा-वेगळा लक्ष वेधून घेणारा हा चहावाला ग्वाल्हेरचा असल्याचे सांगितले जात आहे. या चहाच्या दुकानात तुम्हाला वेगवेगळे चहाच्या प्रकाराचा आस्वाद घेता येईल.

- Advertisement -

पत्नीच्या त्रासाने कंटाळलेल्यांना फ्रीमध्ये चहा

विशेष म्हणजे या ‘कालू बेवफा चाय वाला’ दुकानात स्पेशल ऑफर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या दुकानात कालू बेवफा चहावाल्याच्या दुकानात पत्नीपिडीत म्हणजेच पत्नीच्या त्रासाने कंटाळलेल्यांना फ्रीमध्ये चहा मिळणार आहे.

प्रेमात धोका मिळालेल्यांसाठी अनेक प्रकारचा चहा

- Advertisement -

ग्राहकांच्या मनस्थितीचा विचार करून या ‘कालू बेवफा चाय वाला’ विक्रेत्याने अनोखी शक्कल लढवत सर्व चहाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये तुम्ही प्रेमासंबंधी कित्येक चहाचे प्रकार बघू शकतात.

या चहाच्या विविध प्रकारानुसार त्यांची किंमत देखील कमी-जास्त असल्याचे तुम्हाला दिसेल. प्रेमात धोका मिळाला असेल तर त्यांच्यासाठी ‘प्यार में धोखा चाय’ – किंमत ५ रूपये, प्रेमी युगुलाकरता असणारा ‘प्रेमी जोड़ो की स्पेशल चाय’ किंमत ५ रूपये आहे. नवीनच प्रेमात पडलेल्यांसाठी ‘नए प्रेमियों की चाय’ की किंमत ५ रूपये तर मनासारखं प्रेम मिळावं याकरता ‘मन चाहा प्यार पाने वाला चाय’ ४९ रुपये अशी आहे. यासोबतच एकटेपणा आलेल्यांसाठी ‘अकेलापन चाय’ किंमत २० रुपये अशी आहे.

 

- Advertisement -