घरट्रेंडिंग'त्याने' चक्क विमानाच्या लँडिंग गिअरमधून केला प्रवास!

‘त्याने’ चक्क विमानाच्या लँडिंग गिअरमधून केला प्रवास!

Subscribe

फुटकात प्रवास करण्याच्या नादात या व्यक्तीने स्वतःचा जीव गमावला.

लंडनाला जाण्याकरिता एका व्यक्ती चक्क केनिया एअरवेजच्या विमानाच्या लँडिंग गिअरमधून प्रवास केला. या दरम्यान त्याचा बागेत ३५०० फूट उंचावरुन पडून मृत्यू झाला. या व्यक्तीची अजूनही ओळख पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हा व्यक्ती चोरुन लंडनला जाण्यासाठी फुकटात प्रवास करत होता.

या व्यक्तीने नैरोबी ते लंडन असा ९ तासाचा प्रवास लँडिंग गिअरमध्ये बसून केला होता. जेव्हा केनिया एअरवेजचं ७८७ हे विमान हिथ्रो एअपरपोर्टवर लँडिंग करण्यासाठी खाली येत होते. तेव्हा हा व्यक्ती विमान लँडिंग करत असताना एका घरासमोरच्या बागेत ३५०० फूट उंचावरून खाली पडला. हा व्यक्ती खाली पडल्यानंतर तिथे एक छोटा खड्डा पडला. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ज्या बागेत हा व्यक्ती पडला त्यावेळेस तिथे एक तरुण बागेमध्ये सनबाथ करत होता. संबंधित तरुणाला हा प्रकार बघून धक्का बसला.

- Advertisement -

जेव्हा हा व्यक्ती बागेत पडला तेव्हा जोरात आवाज आला त्यामुळे शेजारील लोक देखील घटनास्थळी जमले. ३५०० फूटा वरुन हा व्यक्ती पडल्यामुळे त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडला होता. नशीब हा मृतदेह माझ्यावर पडला नाही अन्यथा माझाही मृत्यू झाला असता, असे त्या बागेतील तरुण व्यक्तीने वृत्तपत्रास माहिती देताना सांगितले. सध्या पोलीस या अज्ञान मृत व्यक्तीची शाहानिशा करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -