घरट्रेंडिंगनिर्भया दोषींचे सर्व मार्ग बंद; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

निर्भया दोषींचे सर्व मार्ग बंद; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

Subscribe

निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरलेला विनय शर्मा याची आणखी एक युक्ती अपयशी ठरली आहे. तिन्ही दोषींचे सर्व कायदेशीर पर्याय पूर्णपणे संपले आहेत. सुप्रीम कोर्टाने विनयची याचिका फेटाळून लावली आहे.

निर्भया प्रकरणात असलेल्या दोषीचे सुप्रीम कोर्टाने सर्व मार्ग बंद केले असून राष्ट्रपतींद्वारे विनय शर्मा या आरोपीने दाखल केलेली दया याचिका फेटाळण्यात आली आहे. दया याचिका करत फाशी टाळण्याची मागणी करणाऱ्या विनयची याचिका शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरलेला विनय शर्मा याची आणखी एक युक्ती अपयशी ठरली आहे. तिन्ही दोषींचे सर्व कायदेशीर पर्याय पूर्णपणे संपले आहेत. कोर्टाने या विषयावर निकाल देताना म्हटले आहे की, विनयच्या वैद्यकीय अहवालानुसार तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे. त्याची तब्येत व्यवस्थित आहे हे कारण देत कोर्टाने विनयची याचिका फेटाळून लावली आहे.

मी अपराधी नाही –

दोषी विनयने गुरुवारी न्यायालयासमोर बाजू मांडत मी एक शेतकरी कुटुंबातील आहे, अपराधी नाही. तसेच आपण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगत आपल्याला फाशी देऊ नये अशी मागणी विनयने सुप्रीम कोर्टात केली होती. विनय शर्माचे वकील ए.पी. सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर दावा केला की विनयला सतत ड्रग्स देण्याबरोबरच तुरुंगात मानसिक छळही केले जातात. तसंच त्यांना असाही आरोप केला आहे की, ” भारतात प्रथमच चार तरुणांना फाशी देण्यात आली आहे. ज्यांच्या आधी कोणता गुन्हा नोंद नव्हता. यावर कोर्टाने वकीलांना फटकारले आणि केवळ कायदेशीर बाबींवर बोलण्यास सांगितले.

- Advertisement -

सुनावणीदरम्यान न्यायाधीश भानुमती बेशुद्ध  

निर्भया प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या विनय कुमार शर्मा यांच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायाधीश भानुमती कोर्टाच्या खोलीतच बेशुद्ध झाल्या. त्यांना तातडीने चेंबरमध्ये घेऊन जाण्यात आले. खंडपीठाने सुनावणी तहकूब केली आणि नंतर हे आदेश जारी केले जातील असे सांगितले. पण, तात्काळ या दोषीची शिक्षा कायम असून दाखल केलेल्या दया याचिकेला कोर्टाने फेटाळले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -