Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग नादच खुळा! चपला घाला चार लाख कमवा!

नादच खुळा! चपला घाला चार लाख कमवा!

बेरोजगारांना घरबसल्या लाखो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात नोकऱ्या गेल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर घरबसल्या काम करण्याच्या अनेक जाहिराती समोर येत आहेत. अशा प्रकारच्या एका जाहिरातीची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. ही एका चप्पल कंपनीची जाहिरात आहे. कोणतीही मेहनत न करताना ही कंपनी फक्त चपल घालण्याकरिता लाखो रुपये देणार आहे. हे वाचून तुम्हाला अजब वाटत असेल. पण हे सत्य आहे. या चप्पल कंपनीने खास घरबसल्या काम करण्याची सुवर्णसंधी दिली आहे.

नक्की कंपनीचे काय आहे काम?

या कंपनीच्या चपला तुम्हाला घरबसल्या दोन दिवस घालायच्या आहेत. या चपल तुम्हाला १२ तास घालून राहावे लागले. त्यानंतर तुम्हाला या चपलाचा अनुभव कसा आहे? त्या आरामादायी आहेत का? याची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. ही उत्तरे दिल्यानंतर कंपनी तुम्हाला वर्षाला ४ लाख २० हजार रुपये देईल म्हणजेच महिन्याला साधारण ३५ हजार रुपये मिळतील. दरम्यान तुम्ही शेअर केलेल्या अनुभवाच्या आधारे कंपनी चांगले काम करू शकेल. तसेच कंपनीचे काही नाईट वेअर्सचीही काही निवडलेल्या उमेदवारांना टेस्टिंग करावी लागेल.

या नोकरी करता अर्ज कुठे भरायचा?

- Advertisement -

या कंपनीचे नाव Bedroom Athletics असे असून सध्या कंपनीने Slipper Tester पदासाठी अर्ज मागवले आहेत. गेल्या वर्षीही अशाच प्रकारे Slipper Tester पदासाठी अर्ज मागवले होते. यावर्षीच्या या पदाच्या जाहिरातील तुफान असा प्रतिसाद मिळाला आहे. ही जाहिरात दोन पदांसाठी आहे. एक महिला आणि एक पुरुष. यासाठी तुम्हाला www.bedroomathletics.com या दिलेल्या वेबसाईटवर अर्ज भरावा लागेल. यामध्ये तुमचे नाव, फोन नंबर, ई-मेल आयडी अशा प्रकारची माहिती द्यावी लागले. तसेच १०० शब्दात तुम्ही या नोकरीसाठी कसे योग्य आहात? तुम्हाला कंपनीने नोकरी का द्यावी, याची माहिती देखील द्यावी लागले. जर तुमचे उत्तर कंपनीला पटले तर कंपनी तुम्हाला नोकरीची ऑफर देईल.


हेही वाचा – कोरोना घालवण्यासाठी जपानी लोकांचा ‘आईस बाथ’


- Advertisement -

 

- Advertisement -