Video: सोशल मीडियावर ‘हा’ कुत्रा ठरलाय स्टार; बघा त्याच्या करामती

या कुत्र्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ फक्त इन्स्टाग्रामवरच नाही तर फेसबुक, टिकटॉक, यू ट्यूब आणि ट्विटरवर शेअर होत आहे

Mumbai

हल्ली कोणतीही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुत्रा या प्राण्याला माणसाचा जवळचा आणि प्रामाणिक मित्र मानले जाते. काहीवेळा कुत्र्याचे असे कारनामे बघून कित्येकदा आपण हैराण देखील होतो. मात्र सोशल मीडियावर एका कुत्र्याची चांगलीच चर्चा आहे. हा कुत्रा सोशल मीडियावर स्टारच ठरला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये कुत्र्याने केलेल्या करामती बघून तुम्ही थक्क व्हाल.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तो सहजपणे त्याच्या डोक्यावर अनेक गोष्टींचा समतोल राखण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या व्हिडिओतील कुत्र्याचे कौशल्य पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक देखील केले आहे.

या कुत्र्याच्या मालकाचे नाव पॉल लावेरी असून ते आपल्या कुत्र्याच्या डोक्यावर अनेक खेळण्याच्या वस्तू ठेवताना दिसतात. मात्र त्याचा हा कुत्रा फक्त खेळण्यातील वस्तूच नाही तर पाण्याने भरलेला ग्लास, पिझ्झा यांसारख्या अनेक गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न हा कुत्रा व्हिडिओमध्ये करताना दिसतो.

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम वरील harlso_the_balancing_hound या नावाने असणाऱ्या पेजवरून व्हायरल होत असून त्याचे १.१५ फॉलोअर्स आहे. या कुत्र्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ फक्त इन्स्टाग्रामवरच नाही तर फेसबुक, टिकटॉक, यू ट्यूब आणि ट्विटरवर शेअर होत आहे.