घरट्रेंडिंगरिव्ह्यू असावा तर असा...

रिव्ह्यू असावा तर असा…

Subscribe

'आंटीज ऑनेस्ट रिव्ह्यू' सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून तिने अतिशय प्रामाणिकपणे चित्रपटाविषयी मते सांगितली आहेत.

सलमान खानच्या ‘रेस ३’ची प्रदर्शनापूर्वीपासून हवा होती. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी मात्र सर्वच कलाकारांना ट्रोल करायला आणि वेगवेगळे व्हिडिओ बनवून व्हायरल करायला सुरुवात केली. याच चित्रपटासाठी एका बाईने दिलेल्या रिव्ह्यूचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे.

आंटीने दिला तुफान रिव्ह्यू

‘रेस ३’ चा खरा रिव्ह्यू थिएटरबाहेर आलेल्या आंटीने दिल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यापूर्वी या आंटीने करिना कपूर आणि सोनम कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’चा देखील रिव्ह्यू केला होता. जो ‘आंटीज ऑनेस्ट रिव्ह्यू’ म्हणून व्हायरल झाला होता. मात्र त्यापेक्षा यावेळच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या व्हिडिओमधून तिने अतिशय प्रामाणिकपणे चित्रपटाविषयी, त्याची कथा, पटकथा, अॅक्शन, ३ डी असायला हवा की नको, बॉबी देओल म्हणजे बॉडी देओल असून आता त्याला बघून नयनसुख नक्कीच मिळेल अशा तऱ्हेने मत मांडले आहे. कोणताही हात न राखता मनाला जे वाटेल ते या रिव्ह्यूमधून आंटीने सांगितले आहे.

- Advertisement -

नेमंक काय आहे रिव्ह्यूत?

कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी तुम्ही काळा चष्मा लावावा आणि काम झाल्यानंतर चश्मा काढून ठेवावा असं सांगत आंटीने या रिव्ह्यूची सुरुवात केली आहे. ‘खूपच माईंडब्लास्टिंग चित्रपट असून सगळ्याच गोष्टीची धज्जिया उडवली आहे.’ असं सहजपणाने आंटीने सांगितले आहे. तर ३ डी असल्यामुळे सगळ्या कार आणि सलमानची छाती एकदम अंगावर असल्याचंही तिने नमूद केलं आहे. आंटीचा रिव्ह्यू ऐकताना साहजिकच हास्याची लकेर चेहऱ्यावर उमटते. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १२ हजार ४१८ व्ह्यूज मिळाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -