Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Video : लुंगी आणि फॉर्मल घालून फुटबॉलचा जबरदस्त सराव!

Video : लुंगी आणि फॉर्मल घालून फुटबॉलचा जबरदस्त सराव!

लुंगी, फॉर्मल आणि जीन्स घालून सध्या तीन मुलांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल एकच नंबर भावा.

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. नुकताच तीन तरुणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हे तरुण फुटबॉल घेऊन डान्स करताना दिसत आहे. मुख्य म्हणजे यातल्या एकाने चक्क लुंगी लावून फुटबॉलसोबत डान्स केला आहे. तसेच हा व्हिडीओ बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केला आहे.

काय म्हणाली रवीना?

हा व्हिडीओ पाहून रवीनाने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘शाब्बास मुलांनो. मी याआधी असे कधीच टॅलेंट पाहिलेले नाही. हे खूप अद्भूतपूर्व आहे’.

काय आहे या व्हिडीओत?

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये ही मुले फुटबॉलसोबत जबरदस्त डान्स करत आहेत. या व्हिडीओच्या मागे गुलेबागावली या सिनेमाचे गुलेबा हे गाणं वाजवण्यात आले आहे. मात्र तुम्ही हा व्हिडीओ नीट पाहिल्यास ही मुले डान्स नाहीतर तर फुटबॉलसोबत सराव करताना दिसत आहेत’.

या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या तीन मुलांपैकी एकाचे नाव प्रदीप रमेश असून हा फ्रीस्टाइल फुटबॉलपटू आहे. फ्रीस्टाइल फुटबॉलमध्ये त्याच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही आहे. दरम्यान, हा व्हिडीओ ५० हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर, ४१ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पसंत केला आहे. यात सगळ्यांचे लक्ष लुंगी घालून फुटबॉल खेळणाऱ्या तरुणांने वेधले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मास्क व्यवस्थित घालण्याचा सल्ला दिला म्हणून घेतला चावा!


- Advertisement -