‘टिक टॉक’ वर बंदी, तरिही नेटीझन्स डाऊनलोड करतायत

Mumbai
central government direct to google and apple to delete tik tok app from play store
'टिक टॉक'

भारताने टिक टॉक अॅपवर बंदी घातली असली तरी हे अॅप आडमार्गाने डाऊनलोड करता येत असल्याचे समोर आले आहे. चीनच्या बीटडान्स कंपनीचे हे अॅप असून भारताने मागणी केल्यानंतर गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून टिक टॉक अॅप हटवण्यात आले होते. प्ले स्टोअरवरून अॅप काढून टाकण्यात आले असले तरी ज्या लोकांनी हे अॅप आधीच डाऊनलोड केलेले आहे. त्यांच्या मोबाईलमधून मात्र ते निघणार नाही. ते व्हिडिओ बनवून अपलोड करु शकतात. याचा अर्थ नवीन युजर्स अॅप डाऊनलोड करू शकणार नाहीत असे नाही.

सध्या स्मार्टफोनमध्ये Android आणि iOS अशा दोन ऑपरेटिंग सिस्टीम सर्वात जास्त वापरल्या जातात. त्यापैकी अॅपलचे iOS अॅप्लिकेशनच्या बाबतीत फार कडक आहे. इतर कोणत्याही साईटवरून डाऊनलोड केलेले अॅप आयफोनवर चालत नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूला अँड्रॉइड हे ओपन सोर्स इकोसिस्टिमवर आधारीत असल्याने ते थर्ड पार्टी अॅप्लिकेशन वापरण्यास परवानगी देते. त्यामुळे अशा बंदी असलेल्या अॅपच्या एपीके फाईल (APK file) डाऊनलोड करुन विशिष्ट अॅप मोबाईलमध्ये घेता येते.

हे वाचा – रातोरात टिक-टॉक स्टार बनली औरंगाबादची विष्णूप्रिया

गुगलमध्ये गेल्यानंतर फक्त एपीके फाईलच्या नावाने सर्च केल्यास तुम्हाला ढीगभर साईटच्या लिंक्स मिळतील. जिथून बंदी असलेले अॅप डाऊनलोड करता येते. टिक टॉकच्या बंदीनंतर आता अशा साईट्सवर नेटीझन्स विझिट करत आहेत. थर्ड पार्टी अॅप्लिकेशनची माहिती देणाऱ्या फोरम्सवर आता याबाबत चांगली चर्चा झडू लागलीये.

मात्र, अनोळखी वेबसाईटवरून एपीके फाईल डाऊनलोड करणे तुम्हाला भारी ठरू शकते. कारण अशा साईटवरून एपीके फाईल डाऊनलोड केल्यास तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस, मालवेअर येऊ शकतो. अशा अॅपची जबाबदारी गुगल घेत नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here