‘टिक टॉक’ बंदीमुळे युजर्स नाराज; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

भारताने टिक टॉक अॅपवर बंदी घातली असल्याने टिक टॉकचे युजर्स चांगलेच नाराज झाले आहेत.

Mumbai
central government direct to google and apple to delete tik tok app from play store
'टिक टॉक'

सध्या तरुणाईला टिक टॉक अॅपने भुरळ घातली आहे. या अॅपमार्फत तरुण मुलं-मुली एखाद्या गाण्यावर किंवा डायलॉगवर व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. अल्पावधीतच टिक टॉक अॅप लोकप्रिय झाले आहे. परंतु, केंद्र सरकारने गुगल आणि अॅपलमधून ‘टिक टॉक’ अॅप डिलीट करण्याचे आदेश दिल्यानंतर हे अॅप डिलीट करण्यात आले आहे. चीनच्या बीटडान्स कंपनीचे हे अॅप असून भारताने मागणी केल्यानंतर हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक अॅप हटवण्यात आले आहे. मात्र, प्ले स्टोअरवरून अॅप काढून टाकण्यात आल्यामुळे युजर्स चांगलेच नाराज झाले आहेत.


वाचा – रातोरात टिक-टॉक स्टार बनली औरंगाबादची विष्णूप्रिया


भारताने टिक टॉक अॅपवर बंदी घातली असल्यामुळे टिक टॉकचे युजर्स चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी मीडियावरुन जाहीरपणे व्यक्त केली आहे. तसेच नेटिझन्सनी काही Memes तयार केले आहेत. सोशल मीडियावर हे Memes तुफान व्हायरल होत आहेत. पाहुया, अशाच काही Memes ची झलक.


वाचा – ‘टिक टॉक’ वर बंदी, तरिही नेटीझन्स डाऊनलोड करतायत


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here