‘टिकटॉक’च्या विराट कोहलीची बॉलिवूड एण्ट्री

टिकटॉकवरील विराटला बॉलिवूडमध्ये मिळाला ब्रेक

टिकटॉकवर काही व्हिडिओ व्हायरल होतात की, ज्यांना नेटकऱ्यांची खूप पसंती मिळते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या टिकटॉक व्हिडिओमुळे काही लोक एका रात्रीत स्टार झाले. टिकटॉक या अॅप्लिकेशनमुळे सर्वसामान्य लोक देखील सेलिब्रिटी झाले आहेत. प्रसिद्ध सेलिब्रिटी कलाकारांची नक्कल करत या सर्वसामान्य माणसांना टिकटॉक या अॅपने सेलिब्रिटी बनवले आहे.


हेही वाचा- रानूच्या मुलीचा आवाज तुम्ही ऐकला का?; माय-लेकींचा व्हिडिओ व्हायरल


असाच एक व्यक्ती आहे जो टिकटॉकचा विराट कोहली म्हणून ओळखला जातो. या टिकटॉकवरील सेम टू सेम दिसणाऱ्या विराट कोहलीचे नाव गौरव अरोरा असून तो जशाच तसा क्रिकेटर विराट कोहली सारखाच दिसतो. यामुळेच आता या टिकटॉकवरील विराटला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला आहे. अभिनेत्री सोनम कपूरच्या आगामी ‘जोया फॅक्टर’ या चित्रपटात हा टिकटॉक स्टार विराट कोहली अर्थात गौरव अरोरा दिसणार आहे.

सोनम कपूरने स्वतःच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गौरव अरोरा हा विराट कोहलीच्या अंदाजात दिसत आहे. या व्यक्तीला टिकटॉकवरचा विराट कोहली बोलले जाते. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात तो ग्राऊंडवर मॅच बघायला गेला होता. त्या ठिकाणी विराट कोहली देखील या नकली विराटला बघून थक्क झाला होता. यानंतर गौरव प्रसिद्ध झाला आणि त्याचे बरेच व्हिडिओ विराट कोहलीवर असतात.