Wednesday, March 3, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक Tik Tokयुझर्सच्या अपेक्षा धुळीला, भारताचा टिक टॉकला कायमचा बाय बाय

Tik Tokयुझर्सच्या अपेक्षा धुळीला, भारताचा टिक टॉकला कायमचा बाय बाय

भारताचा डेटा सुरक्षित राहणे, प्राइव्हसी या गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. टिक टॉकचे भारतात एकूण १० कोटींहून अधिक युझर्स होते.

Related Story

- Advertisement -

भारतात सर्वात प्रसिद्ध असलेले चीनी App म्हणजे टिक टॉक. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच टिक टॉकच्या प्रेमात होते. भारतात पुन्हा एकदा टिक टॉक सुरु व्हावे यासाठी अनेक लोक प्रार्थना करत होते. मात्र आता त्याचा काही फायदा नाही कारण भारताने टिक टॉक हे चायनीज App कायमस्वरुपी बंद केले आहे. त्याचबरोबर इस्टंट मेसेजिंग App We Chatसह ५९ चायनीज App भारताने कायमस्वरुपी बंद केले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात चायनीज App वापरणाऱ्या युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. टिक टॉक नंतर PUB Gbवरही बंदी आणण्यात आली.

भारतातील लोकांना अशी अपेक्षा होती की भारत सरकार बंदी घातलेल्या चायनीज App पुन्हा एकदा वापरण्यासाठी परवानगी देईल. यासाठी अनेक डेव्हलपर्स आणि भारताच्या कार्यप्रणाली पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी अनेकदा सरकराला याविषयी पटवून देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. टिक टॉक हे चायनीज App भारतात पूर्णपणे बंद झाले यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

- Advertisement -

Meity (Ministry of Electronics and Information Technology) ने दिलेल्या रिपोर्टनुसार, जून २०२० मध्ये भारतात ५९ चायनीज Appवर भारतात बंदी घालण्यात आली. मात्र आता हे Appकायमस्वरुपी बंद झाले आहेत. भारताचा डेटा सुरक्षित राहणे, प्राइव्हसी या गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. टिक टॉकचे भारतात एकूण १० कोटींहून अधिक युझर्स होते. टिक टॉकच्या माध्यमातून हजारो लोक पैसे कमवत होते. भारताने बंदी घातलेल्या app मधील आणखी एक महत्त्वाचा App होता ते म्हणजे पब जी. टिक टॉक नंतर पब जीही बंद करण्यात आले. पब जी बंद झाल्यानंतर डेव्हलपर्सनी पब जी मोबाईल इंडिया नावाचे एक गेमिंग App सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला मंजूरी मिळाली नाही. भारतात पब जीचेही लाखो युझर्स होते.


हेही वाचा – ‘Xiaomi Mi 10T’ फोन झाला तब्बल ३ हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

- Advertisement -