घरट्रेंडिंगजीवनात यशस्वी व्हायचंय? या ५ गोष्टी टाळा!

जीवनात यशस्वी व्हायचंय? या ५ गोष्टी टाळा!

Subscribe

आपण आयुष्यात यशस्वी होण्याचा निर्धार करतो, त्यावेळी त्या दृष्टीने योग्य प्रयत्न करणं, आवश्यक ती मेहनत घेणं आवश्यक असतंच. मात्र त्याचसोबत काही अनावश्यक आणि नकारात्मक गोष्टी तसंच सवयी टाळणं हेदेखील गरजेचं असतं. कारण बऱ्याचदा या चुकीच्या सवयी आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा बनण्याचा धोका असतो. चला जाणून घेऊयात अशा ५ महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही प्रगतीपथावर असताना हमखास टाळल्या पाहिजेत.

१. स्वत:च्या क्षमतेवर शंका घेणं टाळा – एखादं काम करण्याआधी मी ते नीट करु शकेन का? अशी भीती वाटणं साहाजिक आहे. मात्र ती भीती मनातून काढून टाका. ‘मला हे काम नक्की जमेल व मी ते यशस्वीपणे पार पाडीन’ असा विश्वास स्वत:च्या मनात निर्माण करा. तुमचं ध्येय स्पष्ट असेल व तुमचा तुमच्या क्षमतेवर विश्वास असेल, तर तुम्ही यशस्वी नक्की व्हाल.

- Advertisement -

२. भावनांच्या आहारी जाऊ नका – एखादं काम करत असताना काहीवेळा खूप चिडचिड होणं, दु:खी वाटणं किंवा निराश व्हायला होणं स्वाभाविक आहे. मात्र अशावेळी तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा ठेवायला हवा. कारण गरजेपेक्षा जास्त भावनिक झाल्यास तुमचं काम कधीच योग्य दिशेने होणार नाही. भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका.

३. वरिष्ठांना खूश करण्यासाठी काम करु नका – स्वत:ला सिद्ध करुन दाखवण्याच्या स्पर्धेत प्रत्येक जण चांगलं काम करत असतो. मात्र केवळ वरिष्ठांना खूश करण्यासाठी, त्यांची वाहवा मिळावी म्हणून काम करु नका. त्यामुळे बरेचदा चुकीचं काम होण्याची शक्यता असते. केवळ लोकांची वाहवा मिळवण्यापेक्षा स्वत:च्या समाधानासाठी व प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करा.

- Advertisement -

४. ‘ब्लेम गेम’ खेळू नका – बरेचदा आपण अयशस्वी होण्याचं खापर इतरांवर किंवा आपल्या नशिबावर फोडतो. कोणाच्यातरी चुकीमुळे माझं नुकसान झालं, असं आपण म्हणून मोकळे होतो. मात्र, अशावेळी तुम्ही कुठे कमी पडलात, तुमच्याकडून काय चुका झाल्या ज्यामुळे तुम्ही अयशस्वी झालात ते शोधून काढा. इतरांना वा नशिबाला दोष देण्यापेक्षा तुमच्यातील दोष दूर केलेत, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

५. चुकीची संगत टाळा – आयुष्यामध्ये चांगल्या लोकांची संगत खूप गरजेची असते. तुमच्या खासगी तसंच व्यावसायिक प्रगतीसाठी ते अत्यावश्यक असतं. त्यामुळे तुम्ही ज्या लोकांसोबत राहता – वावरता ते तुमचे पाय खेचणारे वा तुमची दिशाभूल करणारे नाहीत याची काळजी घ्या. जे लोक तुम्हाला नेहमीच मदत करतील, चांगले सल्ले देतील तसंच योग्य दिशा दाखवतील अशाच लोकांच्या संगतीत राहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -