पावसाळ्यात फिरायला जायचंय? मग प्लॅनिंग करण्याआधी हे वाचा!

पावसाच्या पहिल्या सरींसोबतच आपलं पिकनिक प्लॅनिंग सुरू होतं. पण योग्य ठिकाणं निवडली नाहीत, तर मात्र सुट्टी वाया गेल्याचं दु:ख आपल्याला होतं. पण तसं होऊ नये, म्हणून थोडाफार अभ्यास करूनच आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हीला हा लेख नक्कीच उपयोगी ठरेल.

Mumbai
rainy photo
पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी काही खास ठिकाणं

पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे. पावसात भिजण्यासारखा दुसरा आनंदच नाही. पाऊस येण्याअगोदरपासूनच फिरायला कुठे जायचं? असा अनेकांना प्रश्न पडतो. परंतु, पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी योग्य ठिकाणं माहिती नसल्यामुळे अनेकजणं गोंधळून जातात. मात्र, या अडचणीचं ओझ कमी करण्यात आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. इथे अशी काही ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही तुमची धम्माल पावसाळी ट्रीप प्लॅन करू शकता. तुमच्या फॅमिलीसोबत किंवा मित्रमंडळीसंबोतदेखील तुम्ही ही ठिकाणं एन्जॉय करू शकता!

रतनवाडी: अहमदनगरमधील रतनवाडी हे भंडारदऱ्यापासून अगदी जवळचं ठिकाण आहे. रतनवाडीला रतनगड किल्ला आणि अमृतेश्वर मंदीर हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. ट्रेकिंगचे शौकीन असणाऱ्यांसाठी हे उत्तम असं ठिकाणं आहे.

भंडारदरा: अहमदनगरमधील अकोला तालुक्यातील भंडारदरा हे ठिकाण पावसाळी पिकनिकसाठी एक जबरदस्त स्पॉट आहे. इथले विल्सन डॅम आणि ऑर्थर लेक ही ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत. दरवर्षी पावसाळ्यात इथे ‘काजवा महोत्सव’देखील भरतो.

घाटघर: अहमदनगरमधल्याच अकोल्यातील घाटघर म्हणजे ओलेचिंब होण्यासाठीचे सुयोग्य ठिकाण. घाटघर येथे दरवर्षी पावसाळ्यात ५ हजार मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. हिरवीगार झाडं, उंच डोंगर आणि मोठा जलविद्युत प्रकल्प ही घाटघरची खरी ओळख आहे.

माळशेज घाट: हा घाट पावसाळ्यात अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. घाटाच्या दोन्ही बाजूने विशाल दरडी, त्यातून झुळझुळ वाहणारे धबधबे, गारगार वारा आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा हे माळशेज घाटाचं वैशिष्ट्य आहे.

कळसुबाई: जर तुम्हाला पावसाळ्यात दाट हिरव्यागार झाडीतून पावसात भिजत ट्रेकिंग करावंस वाटत असेल तर कळसुबाई हे ठिकाण तुमच्यासाठीच परफेक्ट आहे. कळसूबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून देखील ओळखलं जातं.