दूध कारखान्यात कर्मचाऱ्यानेच केली दुधाने अंघोळ; बघा Viral Video

या कर्मचाऱ्याचे हे किळसवाणे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत

सोशल मीडियावर काही शेअर केलं की, काही क्षणातच व्हायरल होतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तुर्कीमधला एका दुधाच्या फॅक्ट्रीमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण झाल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की…

दूध हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. काहींना दूध अजिबात आवडत नाही तर काहींना खूप दूध आवडते. पण कॅल्शियम आणि प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले दूध आहारात असावे, असे नेहमी सांगितले जाते. दरम्यान बहुतांश लोकं पॅकिंग दूध विकत घेत असतात, याच फॅक्ट्रीमधील व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फॅक्ट्रीत दुधाच्या भरलेल्या टबमध्ये आंघोळ करताना दिसतोय. अंघोळ करताना तो दूध अंगावर घेताना दिसतोय. हा व्हिडिओ तुर्कीतील सेंट्रल अनटोलीअन या डेअरीमधील आहे. दुधाच्या टबमध्ये बसलेल्या या कर्मचाऱ्याचे नाव एमरे सायर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीचे नाव युगूर तुरगुट असे आहे. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असल्याची माहिती समोर येतेय. या कर्मचाऱ्याचे हे किळसवाणे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. काहींनी तर याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


Big Breaking: अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; अंतरीम जामीन मंजूर