घरट्रेंडिंगट्विटरने गमावले ९० लाख युजर्स

ट्विटरने गमावले ९० लाख युजर्स

Subscribe

ट्विटरने पहिल्यांदाच ९० लाख युजर्स गमावले आहेत. सोशल मीडियावर बोलबाला असतानाही असे नक्की का झाले ? याचे नेमके कारण काय?

सोशल मीडियावर फेसबुक, ट्विटरचा बोलबाला आहे. लाखोंच्या प्रमाणात फेसबुक आणि ट्विटरचे युजर्स आहेत. मात्र, चालू वित्तीय वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीमध्ये ट्विटरने आपले साधारण ९० लाख युजर्स गमावल्याचा अहवाल फोर्च्युनने दिला आहे. इतकंच नाही तर कंपनीसाठी हा सर्वात मोठा धक्का असून पहिल्यांदाच इतके लाख युजर्स कंपनीने गमावले आहेत.

काय आहे फॉर्च्युनच्या अहवालात?

फॉर्च्युनने आपल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे गुरुवारी साधारण ५० लाख युजर्स गमावण्याचा अंदाज लावण्यात आला होता. सध्या ट्विटरचे ३.२६ कोटी सक्रिय युजर्स आहेत. दरम्यान कंपनी स्वचलित बोट्सचा प्रयोग करत युजर्सवर निशाण साधत असलेले आपले स्पॅम अकाऊंट्स बंद करत आहे, त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने युजर्स गमावले असल्याचे कारण ट्विटरने दिले आहे. दरम्यान मायक्रो – ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या बर्‍याच युजर्सने फॉलोअर्स प्रचंड वेगाने कमी होत असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान असे असले तरीही कंपनीला तिमाहीमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. इतकंच नाही तर कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांवरही याचा कोणताही परिणाम दिसून आलेला नाही हेदेखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

युजर्स घटूनही तिमाहीत फायदा

युजर्सची संख्या ९० लाखांनी घटली असली तरीही ट्विटरने या तिमाहीमध्ये चांगली कमाई केली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी कंपनीचा महसूल २९ टक्क्यांनी वाढून ७५.८१ कोटी डॉलर इतका मिळाला आहे. पण तरीही या तिमाहीमध्ये ट्विटरने गमावलेले ९० लाख युजर्स हा आकडा सर्वात वाईट असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -