घरट्रेंडिंगअबब! १८ वर्षात तिने दिला ४४ बाळांना जन्म

अबब! १८ वर्षात तिने दिला ४४ बाळांना जन्म

Subscribe

या जगात अनेक व्यक्ती अजब-गजब विक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. अशीच एक महिला युगांडामध्ये आहे. युगांडामध्ये मरियम नाबटेंजी नावाची एक ४० वर्ष वयाची महिला आहे. या महिलेला आफ्रिकेतील ‘मोस्ट फर्टाइल वुमन’ असे म्हटले जाते. यामागे एक विशेष कारण आहे. मरियमने मागील १८ वर्षात तब्बल ४४ मुला-मुलींना जन्म दिला आहे. तिने हा एक विक्रमच केला आहे. मरियम ज्या भागात राहते. तेथे सर्वदूर तिची किर्ती पसरली आहे. तिच्या गावातील लोक तिला ‘नालोंगो मुजाला’ असे म्हणतात. नालोंगो मुजाला म्हणजे अशी महिला जी एकाच वेळी चार बाळांना जन्म देऊ शकते. ती आतापर्यंत १८ वेळा गर्भवती राहिली आहे.

मरियमने आतापर्यंत सहा वेळा जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तर चार वेळा तिला तीळं (एकाच वेळी तीन मुलांना जन्म देणे) झालं आहे. विशेष म्हणजे तिने तीन वेळा चार-चार बाळांना जन्म दिला आहे. मरियमने आतापर्यंत जन्म दिलेल्या ४४ पैकी ३८ मुले-मुली जिवंत आहेत. तिची ६ मुले जगू शकली नाहीत.

- Advertisement -

कसं सांभाळते मुलांना

हल्लीच्या महागाईत सर्वसामान्य दाम्पत्याला दोन मुले सांभाळणेही कठीण जाते. त्यामुळे मरियम या मुलांचा कसा सांभाळ करते, याचे अनेकांना कुतूहल आहे. मरियम व तिची सर्व मुले सर्वजण एकाच परिवारात राहतात. मरियमचा पती रोजगारासाठी परिवारापासून दूर राहतो आणि कधी कधी घरी येतो. अशात परिवाराचे पोट भरण्याचे काम मरियम एकटीच करते. मरियम कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी मजूरीचे काम करते. तसेच ती महिलांचा मेकअपदेखील करते.

असा आहे मरियमचा प्रवास

मरियम जेव्हा १२ वर्षांची होती तेव्हा तिचे तिच्यापेक्षा २८ वर्षे मोठ्या व्यक्तीसोबत लग्न लावून देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी मरियमने युगांडातील ‘डेली मॉनिटर’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली होता. या मुलाखतीत तिने सांगितले की, ‘जेव्हा मी १३ वर्षांची होती तेव्हा पहिल्यांदा गर्भवती झाले होते. त्यावेळी मी जुळ्या बाळांना जन्म दिला. वर्षभराने मी पुन्हा गर्भवती राहिले. प्रसूतीवेळी मला तीळं झालं. त्यानंतर पुन्हा एका वर्षाने मी चार बाळांना जन्म दिला. लोकांनी या गोष्टीचे फार आश्चर्य व्यक्त केले. परंतु मला याचे फार आश्चर्य वाटले नाही, कारण माझ्या बाबांना ४५ मुलं होती. २०१६ साली तिने तिच्या ४४ व्या बाळाला जन्म दिला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तिचा नवरा खूप कमी वेळा घरी परततो. त्यामुळे गेल्या तीन वर्षात तिने एकाही मुलाला जन्म दिलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -