Video: करंट लागल्याने वाळूमध्ये पूरलं! वाचा पुढे काय घडलं

Mumbai
up pilibhit man gets electrocuted family bury him alive viral video on social media
करंट लागल्याने वाळूमध्ये पूरलं! वाचा पुढे काय घडलं

सध्या विजेचा झटका लागून जीव गेल्याचा अनेक धक्कादायक घटना घडतं आहे. उत्तर प्रदेशमधील पिलीभीत जिल्ह्यातील नागरिकांनी विजेच्या झटका लागल्यानंतर एक आगळा वेगळा उपाय केला आणि या उपाय दरम्यान त्या व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला. या जिल्ह्यातील एका व्यक्तीला विजेचा झटका लागल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला ५ तास वाळूमध्ये वाळूत पुरले आणि त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिलीभीत या जिल्ह्यातील गजरौल परिसरातील पिंडरा या गावात सरदार जोगा सिंह या शेतकऱ्यांच्या शेतातचं घर आहे. त्याच्या घराच्या वरती हायटेन्शन लाईन आहे. जोगा सिंह हे त्याच्या घराच्या अंगात उभे होते तेव्हा हायटेन्शन लाईन ही तुटली आणि ती अंगणात येऊन पडली. त्यामुळे जोगा सिंह यांना विजेचा जोरदार झटका लागला आणि ते जळले.

त्याच्या घरातील नातेवाईकांचा असा विश्वास आहे की, एखाद्याला विजेचा झटका लागला असेल तर त्याला वाळूत पुरल्याने तो व्यक्ती बरा होतो. त्यामुळे सिंह याच्या नातेवाईकांनी एक खड्डा खोदून जोगाला त्या खड्ड्यातं पुरले. जोगचे डोकं, हात आणि पाय बाहेर ठेऊन बाकी सर्व शरीर त्यांनी खड्ड्यामध्ये पुरले.

जोगा सिंहला वाळूत पुरल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचे हातपाय चोळायला सुरुवात केली. परंतू या दरम्यान जोगा सिंहचा मृत्यू झाला. जोगा याचे नातेवाईकांनी या मृत्यूला जबाबदार वीज विभाग असल्याचं सांगितलं आहे. कारण सिंह याचे घर ४० वर्षे जुने असल्याने वीज विभागाने याघराकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचाकल्याणचा गली बॉय; पत्रीपूलावरुन तरुणाचा भन्नाट रॅप

याचं परिसरातील डॉक्टरांचे असं म्हणणं आहे की, जर त्वरित नातेवाईकांनी त्या भाजलेल्या व्यक्तीला रुग्णालयात उपाचारासाठी आणलं असतं तर त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते. परंतु विजेचा झटका लागलेल्या व्यक्तीला त्याचं अवस्थेत त्याच्यावर उपचार करण्याऐवजी त्याला वाळूमध्ये पुरणे त्या व्यक्तीसाठी प्राणघातक ठरलं आहे.