घरट्रेंडिंगपावसात भिजले म्हणूनच जिंकले; बायडेन-पवार यांच्या पावसातल्या सभेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

पावसात भिजले म्हणूनच जिंकले; बायडेन-पवार यांच्या पावसातल्या सभेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Subscribe

डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. दरम्यान, निवडणूक जिंकल्यानंतर बायडेन यांच्या निवडणूक सभांची चर्चा सुरु आहे. बायडेन यांच्या पावसातल्या सभेची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. बायडेन जिंकल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जो बायडेन यांच्या पावसातल्या सभांचे फोटो शेअर केले आहेत.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार आणि जो बायडेन यांच्या पावसत्लया सभेचे फोटो शेअर करत म्हटले आहे की, “वय जास्त असलं म्हणून काय झालं, लोकांसाठी काम करण्याची ऊर्जा तरुणांनाही मागे टाकणारी आहे. म्हणूनच ते नेहमी विजयी ठरतात.त्यांचा आपल्या मूल्यांवर ठाम विश्वास असतो व ते त्यासाठी संघर्ष करतात. हे आपण महाराष्ट्रात घडताना पाहिलं आणि आता अमेरिकेतही घडलं.”

- Advertisement -

…वय जास्त असलं म्हणून काय झालं, लोकांसाठी काम करण्याची ऊर्जा तरुणांनाही मागे टाकणारी आहे. म्हणूनच ते नेहमी विजयी…

Posted by Supriya Sule on Saturday, 7 November 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बायडेन यांच्या पावसाळी सभेचा फोटो ट्विट केला आहे. “अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष @JoeBiden यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे,” असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

एका ट्विटर यूझरने ट्विट करत म्हटले आहे की, “निवडणुकांमध्ये पावसात सभा घेणारे सगळेच सत्तेत येत आहेत.”

तर सत्या नावाच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत “कोणी काहीही म्हणो. पावसातल्या सभा मात्र हमखास विजय मिळवून देतात,” असे म्हटले आहे.

या ट्विटला रिट्विट करत विजय पुंड यांनी “मला पण सरपंच निवडणूक लढायची आहे, मी पण एखादी पावसात सभा घेतो. झालो तर झालो सरपंच,” असे लिहिले आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -