फेसबुकवर चुकीला मिळणार माफी

आत्ता फेसबूकवरही Delete करता येणार पाठवलेला मेसेज

Mumbai
Users can delete Facebook Messenger messages within 10 minutes

व्हॉट्सअॅपप्रमाणे आत्ता फेसबूकवरही पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे. त्यामुळे आत्ता फेसबुकवरही चुकीला माफी मिळणार आहे. घडलेली चूक सुधारण्याकरता तुमच्याकडे आत्ता १० मिनिटांचा कालावधी असणार आहे.
युजर्स आता पाठवलेला मेसेज १० मिनिटांच्या आत डिलीट करू शकता. हे नवं फिचर नुकतंच मेसेंजरवर आलं आहे अशी माहिती फेसबुकने दिली आहे. सर्वप्रथम हे फिचर iOSचं व्हर्जन 191.0 मध्ये आलं आहे. त्यानंतर आत्ता नुकतंच अँड्रॉइडच्या 4.397 ह्या व्हर्जन मध्ये हे अपडेट आलं आहे.

व्हॉट्सअॅपने ‘डिलीट’ हे फिचर त्यांच्या मेसेजींग अॅप वर आणल्यापासून, युजर्सकडूनं या फिचरला बराच चांगला प्रतिसाद मिळाला होता. कारण केलेली चूक किंवा पाठवलेला चुकीचा मेसेज डिलीट करता येतो हे युजर्सना खूपच आवडले होतं. सुरूवातीला व्हॉट्सअॅपने ७ मिनिटांची वेळ ठेवली होती. मात्र आत्ता ही एक तासाच्यावर वाढविण्यात आली आहे. त्याचमुळे युजर्सकडून फेसबुकवरही अशा फिचरची मागणी केली जात होती.

या नव्या फिचरची चर्चा एप्रिलपासूनच सुरू होती आणि ऑक्टोबरमध्ये या फिचरची चाचणी सुरू झाली होती. नव्या अपडेटमध्ये iOS आणि अँड्रॉइड युजर्स कोणताही मेसेज आत्ता १० मिनिटांच्या आतमध्ये डिलीट करु शकतील. जर एखाद्या युजरने चुकून एखादा मेसेज किंवा फोटो पाठवला, तर Delete करण्यासाठी आत्ता १० मिनिटांचा कालावधी असेल

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here