Viral Video: मुंबईच्या वडा पावला गुजरातच्या आईस्क्रीम पावची स्पर्धा!

पाहा कसा बनवतात आईस्क्रीम पाव?

gujarati man makes ice cream pav instead of vada pav video is going viral
Viral Video: मुंबईच्या वडा पावला गुजरातच्या आईस्क्रीम पावची स्पर्धा!

मुंबईच्या लोकांना वडा पाव खायला खूप आवडतो. वडा पाव म्हटले की चटकन तोंडाला पाणीच येत. काहीजणांना वडा पावसोबत हिरवी-लाल चटणी खायला खूप आवडते. तर काहींना वडा पावसोबत हिरवी मिरची खायचा खूप आवडते. मुंबईत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वडा पाव बनवला जातो. तसेच मुंबईत जम्बो वडा पाव, भाऊचा वडा पाव, लक्ष्मण वडा पाव अशा अनेक पद्धतीनचे वडा पाव प्रसिद्ध आहे. पण तुम्ही कधी वडा पावऐवजी आईस्क्रीम पाव खाल्ला आहे का? आता मुंबईच्या वडा पावला गुजरातचे आईस्क्रीम पाव टक्कर द्यायला आले आहे. सध्या सोशल मीडियावर वडा पावऐवजी आईस्क्रीम पावची चर्चा जोरदार सुरू आहे. गुजरात मधला एक व्यक्ती हा आईस्क्रीम पाव बनवत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण आश्चर्यचकीत झाले आहे.

व्हिडिओमध्ये तो व्यक्ती कशापद्धतीने आईस्क्रीम पाव बनवत आहे हे तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा हा व्यक्ती पावात चटणी ऐवजी बर्फाच्या गोळ्याचे रंग फ्लेवर्स टाकताना दिसत आहे. त्यानंतर तो पावात आईस्क्रीम घालून सर्व्ह करताना दिसत आहे.

 

१५ सप्टेंबरला हा व्हिडिओ ट्विटर शेअर करण्यात आला होता. ज्याला आतापर्यंत ३७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ३०० हून अधिक लाईक्स मिळाले असून २०० हून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. बऱ्याच लोकांनी या व्हिडिओमधील आईस्क्रीम पाव रेसिपीवर टीका केली आहे. एका युजरने लिहिले आहे की, ‘जगाचा अंत आता जवळ आला आहे.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘यासाठी देव कधीच क्षमा करणार नाही.’


हेही वाचा – सख्खा भाऊ पक्का वैरी! ‘कोंबडी चोर’ म्हणतं असल्यामुळे केला भावाचा खून