घरट्रेंडिंगViral video: हत्ती कारवर बसतो तेव्हा...

Viral video: हत्ती कारवर बसतो तेव्हा…

Subscribe

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून कार ड्राईव्हरच्या शौर्याचे नेटकऱ्यांकडून चांगलेच कौतुक केले जात आहे.

आपल्याला हत्ती हा प्राणी फक्त जंगलात किंवा प्राणी संग्रहालयात बघायला मिळतो. मात्र थायलंडमध्ये हा हत्ती रस्त्यावर फिरताना बघायला मिळाला. हा हत्ती थायलंडच्या खाओ याई नॅशनल पार्क येथे बघायला मिळाला. याच थायलंडच्य़ा खाओ याई नॅशनल पार्कमध्ये अशी घटना घडली ज्यामुळे सगळेच हैरान झालेत. हा हत्ती नॅशनल पार्क येथे असणाऱ्या मोकळा रस्त्यावर फिरत असताना हा हत्ती थेट चालत्या कारवर जाऊन बसला. या सर्व प्रकारामुळे कारचा ड्राईव्हर घाबरला. हत्ती कारच्या दिशेने येतो हे बघून कार वेगाने पुढे नेली यामुळे त्याचा जीव वाचला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून कार ड्राईव्हरच्या शौर्याचे नेटकऱ्यांकडून चांगलेच कौतुक केले जात आहे. अशी घटना थायलंडच्य़ा खाओ याई नॅशनल पार्कमध्ये पहिल्यांदाच घडली.

- Advertisement -

असा घडला प्रकार

वयवर्ष ३५ असणाऱ्या डुए नावाचा हत्ती नॅशनल पार्कच्या रस्त्यावर चालत होता. समोरून कार येताना दिसल्यावर या हत्तीने कारवर बसण्याचा प्रयत्न केला. जेव्हा या हत्तीने आपले संपुर्ण वजन कारवर टाकण्याचा प्रयत्न केला त्यापूर्वीच कार ड्राईव्हरने आपली कार सुसाट वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. पुढे गेल्यानंतर कार ड्राईव्हरने कार बघितली तेव्हा मागील विंडशील्ड तुटल्य़ाला अवस्थेत दिसली आणि कारचा काही भाग दाबला गेला होता.

या घटनेनंतर पार्क अधिकाऱ्यांनी पर्यटकांना अशी परिस्थिती उद्भवल्यास काय करावे हे सांगितले. तसेच बँकॉक पोस्टच्या वृत्तानुसार, असे सांगितले की, जर तुम्ही कोणत्याही जंगलात सफारी करण्यासाठी गेला असाल आणि हत्ती अचानक समोर आला तर त्याचा फोटो न काढता, गाडीत सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -