Video: पिलांना वाचविण्यासाठी कोंबडीची कोब्राशी झुंज

Hen fight Cobra
कोंबडीची कोब्रासोबत झुंज

“आई ही आईच असते, तिच्यासारखी दुसरी कोणीच नसते” असे आपल्याकडे म्हटले जाते. आई मग ती कुणीही असो. मनुष्य किंवा प्राणी. तिच्या आपल्या पिलांबाबतच्या भावना एकच असतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक कोंबडी आपल्या छोट्या छोट्या पिलांना वाचिवण्यासाठी थेट कोब्रासोबत भिडली. तिने कोब्रोसोबत संघर्ष केल्यानंतर तिच्या पिलांची या कोब्राच्या तावडीतून सुटका झाली. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.

भारतीय वन सेवेतील (Indian Forest Service) सनदी अधिकारी सुसंता नंदा यांनी हा ५१ सेकंदाचा व्हिडिओ गुरुवाती ट्विट केला. त्यानंतर या व्हिडिओला चांगलीच प्रसिद्धि मिळत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, एक कोब्रा कोंबडी आणि पिलं असलेल्या जागेत शिरतो. संकटाची चाहूल लागताच कोबंडी त्याच्यावर तुटून पडते. त्यानंतर एक एक करुन पिले बाहेर सटकतात. शेवटचे पिलू बाहेर पडेपर्यंत कोबंडी कोब्राला गुंतवून ठेवते.

यावेली कोब्रादेखील कोंबडीला दंश मारण्याचा अनेक प्रयत्न करतो, मात्र कोंबडी प्रत्येकवेळी त्याला चकवा देण्यात यशस्वी होते. सुसांता नंदा यांनी या व्हिडिओसोबत एक छान कॅप्शन दिले आहे. ते म्हणतात, “ही लढाई शानदार होती. जेव्हा एक आई आपल्या पिलांसाठी लढते, ती लढाई खरोखर जबरदस्त असते. शूरवीर आईने आपल्या पिलांना कोब्रापासून वाचविले.”

सुसांता यांचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी लाईक, रिट्विट करुन व्हिडिओला पसंती दिली आहे. तर काहींनी कमेंट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. एक युजरने कमेंटमध्ये म्हटले आहे की, किती छान.. या आईने आपली सर्व पिले सुरक्षित बाहेर गेली आहेत का? हे पाहत पाहत ती कोब्रोसोबत झुंज करत होती. हे शौर्याचे प्रतिक आहे. एकाने तर सांगितले की, “हा व्हिडिओ पाहताना माझ्या डोळ्यातून पाणी आले. आईचे प्रमे शब्दात व्यक्त करु शकत नाही.”