घरट्रेंडिंगबापरे....खेकड्यालाही आहे सिगारेट ओढण्याचे व्यसन! बघा, Viral Video

बापरे….खेकड्यालाही आहे सिगारेट ओढण्याचे व्यसन! बघा, Viral Video

Subscribe

सध्या सोशल मीडियावर एका खेकड्याचा धुम्रपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

साधारणपणे आपल्याला माणसांना दारू, सिगारेट, तंबाखू, गूटखा यांचे व्यसन असल्याचे ऐकले असेल किंवा माणसं व्यसनाच्या आहारी जातात हे आपल्याला माहिती आहे. परंतु खेकड्याला यापैकी एखादं व्यसन असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का…. तसेच : धुम्रपान करणं आरोग्यास हानीकारक आहे. असं असूनही अनेकांना स्मोकिंग, धुम्रपानाची सवय सोडता येत नाही. दरम्यान, सोशल मीडियावर एका खेकड्याचा धुम्रपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

भारतीय वन सेवेत अधिकारी असलेले सुशांत नंदा यांना पशु-पक्षी, जनावरांचे फोटो-व्हिडिओ आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्याची आवड आहे. कॅमेरामध्ये काढलेले फोटो, व्हिडिओ अनेकदा ते सोशल मीडियावर अपलोड करत असतात. नुकताच त्यांनी एका खेकड्याचा सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला.

- Advertisement -

असा आहे हा व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर एका खेकड्याचा धुम्रपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये खेकडा अगदी माणसाप्रमाणेच स्मोकिंग करताना दिसतोय. काही लोकांनी स्मोकिंग केल्यानंतर सिगरेटचे तुकडे तिथेच टाकल्याचे दिसतेय. या खेकड्याने खाण्याची गोष्ट समजून सिगरेट तोंडात टाकली. त्यातून धूर येऊ लागला. तेवढ्यावरच न थांबता पंजाच्या साहाय्याने तो खेकडा सिगारेट ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -