वृद्ध महिला उकळत्या तेलात हात घालून तळतेय पदार्थ, व्हिडिओ पाहून चक्रावून जाल

Viral video shows woman dipping her hand in hot oil to fry food. Twitter cannot believe
वृद्ध महिला उकळत्या तेलात हात घालून तळतेय पदार्थ, व्हिडिओ पाहून चक्रावून जाल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वृद्ध महिला कडईतील उकळत्या तेलात हात घालून पदार्थ तळताना दिसत आहे. ही महिला उकळत्या तेलात हात घालत असली तरी तिचा हात भाजत नाही आहे, त्यामुळे सध्या हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्य चकीत झाले आहेत. यापूर्वी उकळत्या तेलात हात घालून भजी वैगेरे तळणाऱ्या व्यक्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.

या व्हिडिओमधील घटना सत्य आहे. १२ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला उकळत्या तेलात एक पदार्थ तळताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूचे लोकं तिच्याकडे बघत राहिले आहेत.

यापूर्वी इलाहाबादमधील एका व्यक्तीने अशा प्रकारचा कारभार केला होता. ज्याचे नाव राम बाबू होते. ६० वर्षांचा राम बाबू उकळत्या तेलात हात घालून भजी तळतो. हा देखील राम बाबू सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या राम बाबू गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारे भजी तळत आहे.

पण सध्या व्हायरल होत असलेल्या या वृद्ध महिलेचा कारभार पाहून नेटकऱ्याचा विश्वासच बसत नाही आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा टिकटॉक व्हिडिओ असून एका फर्स्ट व्ही फेस्ट या युजर अकाऊंटवर शेअर केला आहे.


हेही वाचा – नरभक्षी दांपत्याचं भीषण कृत्य! रोज खायचे मानवी मांसापासून बनवलेलं लोणचं आणि बिस्किट