घरट्रेंडिंगVodafone Idea Network Down: नेटवर्क डाऊन, ग्राहक संतापले; ट्विटरवर ट्रेंड मिम्स व्हायरल

Vodafone Idea Network Down: नेटवर्क डाऊन, ग्राहक संतापले; ट्विटरवर ट्रेंड मिम्स व्हायरल

Subscribe

Vodafone आणि Idea या दोन कंपन्यांचे एकत्रिकरण झाल्यानंतर VI या नावाने या कंपनीचे नेटवर्क ओळखले जाते. कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड होऊन VI ची महाराष्ट्रातील सर्विस ढेपाळली आहे. काल पुण्यात तर आज सकाळपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात नेटवर्क डाऊन असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे आपला संताप ग्राहक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. तसेच मिम्सच्या माध्यमातून कंपनीला ट्रोल केले जात आहे.

राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे बुधवारपासूनच अनेक भागात व्होडाफोन आणि आयडियाचे नेटवर्क डाऊन झालेले आहे. त्यामुळे मोबाईल ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. बीड, नाशिक, पुणे या जिल्ह्यात नेटवर्कला सर्वाधिक फटका बसल्याचे सांगितले जात आहे. मात्र कंपनीकडून अजूनपर्यंत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी ट्विटरवरच कंपनीची चिरफाड करायला घेतली आहे.

- Advertisement -

कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या विषयाची दखल घेत एक ट्विट केले आहे. ते म्हणाले की, राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू असल्याने अनेक ठिकाणी मदतीची गरज आहे. अशा स्थितीत वेळीच मदत पोचण्यासाठी संपर्कासाठी मोबाईल कंपन्यांची सेवा विस्कळीत होऊन चालणार नाही. पण काही भागात कॉल ड्रॉप होणं/नेटवर्क न मिळणं या अडचणी येतायेत. मोबाईल कंपन्यांनी याकडं लक्ष द्यावं.”

- Advertisement -

दरम्यान ट्रोलर्सनी व्होडाफोन आणि आयडीयाला चांगलेच फैलावर घेतले आहे. क्रिएटिव्हीटीचा ओघ ट्विटरवर दिसतोय. त्यामुळे ट्रोलरच्या भीतीने तरी नेटवर्क लवकर पुर्ववत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

सर्वात शेवटी कंपनीकडून भन्नाट रिप्लाय देण्यात आलाय तुम्हीच पाहा….

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -