सोशल मीडियातील ट्विटरवर सर्वाधिक कोण अॅक्टिव्ह असेल तर ते म्हणजे मुंबई पोलीस. मुंबई पोलीस नेमही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेळोवेळी अनोख्या ट्विटमुळे मुंबई पोलिसांची चांगलीच चर्चा होत असते. तर मुंबई पोलीस सोशल मीडियाद्वारे नेहमीच मुंबईकरांसह नागरिकांची जनजागृती करत असतात. दरम्यान, डिजिटलायझेनच्या युगात जुळवून घेताना, सोशल मीडियाचा मुंबई पोलिसांनी पुरेपूर वापर केला. या सकारात्मक वापराला ५ वर्ष पूर्ण झाली असून मुंबईकरांना ही माहिती देण्यासाठी देखील मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलचाच वापर केला.
५ वर्षांपूर्वी आपली भेट ट्विटरवर झाली होती. या ५ वर्षांत आम्ही तुमच्या अधिक जवळ येऊ शकलो!
हे आहेत आमचे काही आवडते 'ट्विट'. तुम्ही देखील तुमचे आवडते ट्विट #MyFavMPTweet वापरून नक्की 'शेयर' करा.#5YearsOnTwitter
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 29, 2020
असे म्हणाले मुंबई पोलीस…
‘५ वर्षांपूर्वी आपली भेट ट्विटरवर झाली होती. या ५ वर्षांत आम्ही तुमच्या अधिक जवळ येऊ शकलो!’, असे म्हणत मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना ५ वर्षापूर्वीच्या भेटीची आठवण करून दिली आहे.
5 years too short!
No matter how much longer we ‘tweet in touch’ with Mumbaikars, it can never be enough.
We compiled our nostalgia of #5YearsOnTwitter with some of our favourite tweets! Spotted your favourite here? If not, share it with #MyFavMPTweet We are all eyes to see! pic.twitter.com/U7zchaDrQ3
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 29, 2020
हे ट्विट करत मुंबई पोलिसांनी त्यांना आवडलेले काही ट्विट शेअर केले आहेत. यासह मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना यामध्ये सहभागी करून घेताना त्यांना आवडलेले ट्विट शेअर करण्याचे आवाहन देखील केले आहे. #MyFavMPTweet या हॅशटॅगचा वापर करून मुंबईकरांना त्यांच्या आवडीचे ट्विट शेअर करता येणार आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू असताना लॉकडाऊनच्या काळातही मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून असे अनेक ट्वीट केले होते. या ट्विटच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्यासाठी कित्येक अनोख्या शक्कलही लढविल्या. इतकंच नाही तर सोशल मीडियावर ट्रेंड आणि मिम्स ट्रेंडिंगच्या माध्यमातूनही मुंबई पोलीसांनी सामान्य लोकांना जागरूकही केलं. कोरोना दरम्यान मुंबई पोलिसांचे ट्वीटही जोरदार व्हायरल झाल्याचे दिसले.