कोहलीवर केली सिद्धार्थने टीका

क्रिकेटर विराट कोहलीच्या वक्तव्यावर अभिनेता सिद्धार्थ नारायण याने टीका केली आहे. भारताच्या कर्णधाराकडून अशा प्रकारची भाषा अपेक्षित नसल्याचे त्याने ट्विट केले आहे.

Mumbai
koholi Vs sidhant
प्रातिनिधिक फोटो

क्रिकेट फॅनला देश सोडण्याचा सल्ला दिल्यावरून उदभवलेल्या वादामुळे आता विराटवर सोशल मीडियाच्या माध्यमातून कसून टीका होते आहे. ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ नारायण याने विरोध केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याने विराटला उत्तर दिले आहे. अशा प्रकारचे वागणे भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराला शोभत नसल्याचे त्याने सांगितले.

काय म्हणाला सिद्धार्थ 

सिद्धार्थ ने लिहिले की,”जर तुला किंग कोहली म्हणून आपली ओळख टिकवायची असेल तर भविष्यात वक्तव्य करताना जरा विचार कर. एक भारतीय कर्णधार म्हणून तुझ्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती.”

काय आहे प्रकरण

क्रिकेट टीम कर्णधार विराट कोहलीने एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या फॅन्सला भारतातून बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याच्यावर टीकांचा पाऊस पाडला. याची दखल घेत बीसीसीआयने त्याला झापले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here