घरट्रेंडिंगनकोशा व्हॉट्सअॅप ग्रुपमधून होईल सुटका

नकोशा व्हॉट्सअॅप ग्रुपमधून होईल सुटका

Subscribe

आता नको असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून तुमची सुटका होणार

जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंतीचे सोशल मीडिया अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. हे व्हॉट्सअॅप लोकांना अधिक सुविधा देण्यासाठी आणि युजर फ्रेंडली होण्यासाठी नेहमी नवनवे अपडेट्स घेऊन येतं. मात्र काही वेळा ही व्हॉट्सअॅप देखील डोकं दुखी ठरते. व्हॉट्सअॅपमध्ये बऱ्याचदा नको असलेल्या ग्रुपमध्ये अॅड केले जाते. ज्या ग्रुपमध्ये आपल्या ओळखीचे देखील नाही त्या ग्रुपमध्ये अॅड करुन सतत येणारे एसएमएस नकोसे वाटतात. मात्र यातून आता आपली सुटका होणार कारण एखाद्या ग्रुपमध्ये अॅड होण्यापूर्वी त्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्या व्यक्तींने परवानगी दिल्यानंतरच त्या ग्रुपमध्ये त्यांना अॅड करता येणार आहे.

कशी होणार व्हॉट्सअॅप ग्रुपमधून सुटका

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सध्या कोणाला ही ग्रुपअॅडमिन अॅड करु शकतो. मात्र आता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यापूर्वी त्या व्यक्तीची परवानगी घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीला अॅडकरताना त्या व्यक्तीला एक नोटीफिकेशन जाणार. त्या नोटीफिकेशनमध्ये जर त्या व्यक्तीला अॅड व्हायचे असल्यास त्या व्यक्तीले ते नोटीफिकेशनला स्विकारले आणि जर त्या व्यक्तीला त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्य़े अॅड व्हायचे नसल्यास त्यांनी डिकलाईन करावे. यामुळे आता नको असलेल्या ग्रुपमध्ये अॅड होण्याची डोकं दुखी नसणार आहे.

- Advertisement -

वाचा – आता व्हिडिओ ग्रुप कॉलिंग एका क्लिकवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -