घरट्रेंडिंगबिअर पिणारा उंट होतोय व्हायरल

बिअर पिणारा उंट होतोय व्हायरल

Subscribe

काही व्हिडिओ फारच व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियामुळे सर्वांनाच असे व्हिडिओ अगदी कानाकोपऱ्यात पाहायला मिळत असतात.

सोशल मीडियावरून कानाकोपऱ्यातल्या घडामोडीदेखील माणसाला आजकाल मिळत असतात. काही व्हिडिओ मनाला भावणारे असतात तर काही व्हिडिओ असे असतात जे शेअर केल्यानंतर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत असतात ते त्यांच्यामधील वेगळेपणामुळं. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याची माहिती नसली तरीही ऑस्ट्रेलियामधील असल्याची शक्यता आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उंट बिअर पिताना दिसत आहे.

काय आहे हा व्हिडिओ?

या व्हिडिओमध्ये उंट जवळच्या उभ्या असणाऱ्या एका कारजवळ जातो. त्या कारमधील बसलेला माणूस त्या उंटाच्या तोंडाला आपल्याजवळील बिअरचा कॅन लावतो. पहिल्यांदा थोडीशी बिअर प्यायल्यानंतर उंट संपूर्ण कॅन घेऊन पूर्ण बिअर पिऊन टाकतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. उंट मजेत त्या बिअरचा आनंद घेत होता आणि कारमध्ये असलेल्या माणसांनी त्याचा हा मजेशीर व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत आहे. अर्थात असा हा पहिलाच व्हिडिओ नाही. याआधीदेखील माकडानं बिअर प्यायल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. तर काही प्राण्यांचे इतर व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. यामध्ये कुत्रा, मांजर आणि गाढव यासारख्या प्राण्यांचादेखील समावेश आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -