घरट्रेंडिंगका दिला जात नव्हता शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश?

का दिला जात नव्हता शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश?

Subscribe

केरळमधील पत्तनमत्तिट्टा जिल्ह्यातील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा दिला जात होता. आज त्या लढ्याला यश मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश रोखता येणार नाही, मंदिरात महिलांना दर्शन घेण्याचा अधिकार असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, या मंदिरात महिलांना प्रवेश का दिला जात नव्हता? तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

सर्वात आधी जाणून घ्यायला हवं की, ही प्रथा काय होती आणि कधीपासून सुरू झाली. ही प्रथा जवळ जवळ १,५०० वर्षे जुनी आहे. या प्रथेनुसार वय वर्षे १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. शबरीमाला हे भगवान अय्यप्पा देवाचे मंदिर आहे. अय्यप्पा हे ब्रह्मचारी होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य तपश्चर्या करण्यात व्यतीत केले. त्यामुळे मंदिरात मासिक पाळी येत असलेल्या महिलांना प्रवेश दिला जात नाही. त्यातही प्रामुख्याने १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. साधारणतः मुलींना ११ व्या, १२ व्या वर्षांपासून मासिक पाळी येण्यास सुरूवात होते. ४७, ४८ व्या वर्षापर्यंत महिलांना मासिक पाळी येते. त्यामुळे १० ते ५० वर्षे वयोगटातल्या महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. मंदिराच्या ट्रस्टने अनेकदा असा दावा केला आहे की, ही प्रथा गेल्या १५०० वर्षांपासून सुरू आहे.

- Advertisement -

या प्रकरणाबाबत सरन्यायाधीश काय म्हणाले?

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा सुनावणीदरम्यान म्हणाले की, पूजाअर्चा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. शबरीमाला मंदिराची परंपरा हा धर्माचा भाग मानला जाणार नाही. अय्यप्पा मंदिरात पुजा करण्याचा महिलांनाही मुलभूत अधिकार आहे. असे प्रतिपादन करत सरन्यायाधीशांनी शबरीमाला मंदिराच्या शेकडो वर्षांपासूनच्या परंपरेला घटनाबाह्य ठरवत शबरीमाला मंदिराचे दरवाजे सर्व वयोगटातील महिलांसाठी खुले केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -