जॅक कॅलिसने ठेवली अर्धीच दाढी; कारण वाचून तुम्ही देखील व्हाल थक्क!

Cape Town
jacques kallis
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. त्यामागे कारणही अगदी तसेच आहे. जॅकने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये जॅकने अर्धाच चेहरा शेव्ह (दाढी) केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्धा चेहरा दाढी करण्यामागचे कारण जेव्हा सांगितले तेव्हा अनेकांनी त्याने केलेल्या कामाचे कौतुक केले. जॅक कॅलिसचे नाव क्रिकेट विश्वात सन्मानाने घेतले जाते. त्यामुळे जॅकने असा फोटो का टाकला? असा प्रश्न चाहत्यांना सतावत होता. त्यामुळे त्याच्या एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारला. त्यावर जॅकने जे उत्तर दिले त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. सिनेअभिनेत्यांप्रमाणेच क्रिकेटकरांच्याही स्टाईलला लोक फॉलो करतात. त्यामुळे जॅकने उचलले पाऊल खरच कौतुकास्पद मानले जात आहे.

कॅलिसने का केली हाफ शेव्ह?

जॅक कॅलिसच्या हाफ शेव्ह करण्यामागे फार मोठे आणि महत्त्वाचे कारण आहे. गेंड्याच्या संरक्षणासाठी त्यांने अशाप्रकारचे पाऊल उचलल्याचे आपल्या एका चाहत्याने विचारलेल्या उत्तरात म्हटले आहे. कॅलिसने शेअर केलेल्या फोटोसोबत ‘पुढचे काही दिवस मजेशीर असणार आहेत. हे सगळे एका चांगल्या कामासाठी आहे’, असे जॅकने म्हटले आहे. गेंड्यांच्या संरक्षणासाठी जॅकने अशा प्रकारचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याचा अभिमान वाटत आहे.

 

View this post on Instagram

 

Going to be an interesting few days. All for a good cause 😂🙈Rhinos and golf development @alfreddunhill

A post shared by Jacques Kallis (@jacqueskallis) on

सचिन तेंडुलकरनंतर जॅक कॅलिसचे नाव

जॅक कॅलिस हा दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू आहे. कसोटी सामन्यात सर्वाधिक शतकांमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंतर आफ्रिकेचा जॅक कॅलिसचा जगात दुसरा क्रमांक आहे. त्याने १६६ कसोटी सामन्यांमध्ये पाच वेळा एका डावात पाच विकेट्स घेतले आहेत. याशिवाय त्याने कसोटी सामन्यात एकूण २९२ बळी आणि २०० झेलही टिपले आहेत. याशिवाय एददिवसीय सामन्यांमध्ये कॅलिसने ११,५७९ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ शतक तर ५ अर्धशतकांचा समावेश आहे. यासोबत २५ टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये ६६६ धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये २७३ बळी घेतले आहेत.