घरट्रेंडिंग'टिक-टॉक'ने घेतला एका महिलेचा बळी!

‘टिक-टॉक’ने घेतला एका महिलेचा बळी!

Subscribe

अशी घटना पहिल्यांदाच घडली नसून अनेकजणं टिक-टॉकच्या आहारी गेल्याचे आढळून आले आहेत.

टिक-टॉकच्या आहारी पडून एका महिलेने आत्महत्या केली आहे. तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात ही धक्कदायक घटना घडली. यामुळे जवळच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. टिक-टॉकपासून कशाप्रकारे इतरांना दूर ठेवता येईल? असा प्रश्न अनेक कुटुंबातील लोकांना पडला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता (२९) असे मृत महिलेचं नाव आहे. अनिताचे पती गेल्या काही वर्षांपासून कामानिमित्ताने सिंगापूरला राहत आहेत. या जोडप्याला ४ वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा आहे. अनिताला तिच्या मैत्रिणीकडून टिक-टॉक अॅपच्या बाबतीत कळाले. यानंतर अनिताला या अॅपचं मोठं व्यसन जडलं. अनिता काही दिवसांपासून घरच्यांकडे दुर्लक्ष करत होती. एवढेच नव्हे तर, अनिताच्या मुलीला बाहेर खेळत असताना मोठी दुखापत झाली. यावेळीही अनिता मुलीकडे लक्ष देण्याऐवजी टीक-टॉकवर व्यस्त असल्याची तक्रार कुटुंबियांनी तिच्या पतीकडे केली. त्यानंतर अनिताच्या पतीने तिला समजवलं. तरीसुद्धा तिने टिक-टॉकवरील व्हिडिओ पाहणे बंद केलं नाही. त्यामुळे अनिता आणि तिच्या पतीचं फोनवरच भांडण झालं. या दरम्यान तिच्या पतीने अनिताला ‘फोन फेकून देईन’ अशी धमकी दिली. नैराश्यग्रस्त अवस्थेत अनिताने कीटकनाशक प्यायचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर, अनिताने ‘टीक-टॉक’ ऍपद्वारे चित्रण करुन आत्महत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -