घरट्रेंडिंगकुत्र्याचा पट्टा गळ्यात अडकवून पतीची काढली धिंड, महिलेला ठोकला दंड

कुत्र्याचा पट्टा गळ्यात अडकवून पतीची काढली धिंड, महिलेला ठोकला दंड

Subscribe

लॉकडाऊन असल्याने घराबाहेर फिरणं मुश्किल, महिलेने लढवली अनोखी शक्कल

जगात अद्याप कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव सुरू असल्याने काही देशात अजूनही कडक लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान कॅनडामध्ये असा एक प्रकार घडला, ज्यावर तुम्हाला कसं व्यक्त व्हावं याचा नक्कीच प्रश्न पडेल. कॅनडातील Quebec मध्ये चार आठवड्यांपासून कडक कर्फ्यू आहे. या कर्फ्यूची वेळ रात्री ८ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत आहे. दरम्यान यावेळात आवश्यक काही काम असेल तर तुम्ही बाहेर पडू शकतात. तर घरातील पाळीव प्राण्यांना घराबाहेर फिरायला देखील घेऊन जाऊ शकतात. मात्र एक हैराण करणारा प्रकार या कॅनडात असणाऱ्या कर्फ्यूदरम्यान घडला.

कॅनड्यातील King Street East भागात एका महिलेने असा काही प्रकार केला की ज्यामुळे ती सोशल मीडियावर देखील चर्चेचा विषय ठरली. या महिलेने आपल्या पतीच्याच गळ्यात कुत्र्याच्या गळ्यात अडकवता तो पट्टा बांधला. यावेळी हा विचित्र प्रकार बघता पोलिसांनी महिलेला रस्त्यातच अडवले तेव्हा तिला कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना घराबाहेर फिरण्याचे कारण विचारले. त्यावर ती महिला म्हणाली, मी माझ्या कुत्र्याला फिरवत आहे. यासह ती असंही पोलिसांना म्हणाली की कर्फ्यूदरम्यान पाळीव प्राण्यांना फिरण्यास मनाई केलेली नाही म्हणून मी घराबाहेर पडली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हे नवरा-बायको कोणत्याही प्रकारची बोलणी करण्यास पोलिसांशी तयार नव्हते. दरम्यान पोलिसांनी या दोघांवर १५००-१५०० डॉलरचा दंड ठोठावला. भारतीय रूपयांमध्ये हा दंड साधारण २ लाख रूपयांच्या जवळपास असून मोठा फटकाच या दोघांना बसला आहे. ही पहिलीच घटना नाही तर गेल्या वर्षात नोव्हेंबरमध्ये एकाने stuffed dog ला घराबाहेर फिरण्यास नेले होते. जेव्हा पोलिसांनी या व्यक्तीला अडवले आणि त्याची चौकशी केली तेव्हा या व्यक्तीकडे जीवंत कुत्रा नसून तो खेळण्यातील कुत्रा असल्याचे लक्षात आले. यावेळी पोलिसांनी त्याला इशारा देत सोडून दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -