घरट्रेंडिंगमहिलेने दुधात तयार केली मॅगी; रेसिपी पाहून लोक झाले हैराण

महिलेने दुधात तयार केली मॅगी; रेसिपी पाहून लोक झाले हैराण

Subscribe

महिलेने गोड मॅगी तयार केली असून सध्या या स्विट मॅगीला नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे.

मॅगी ही लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकालाच प्रिय असते. तसेच ही मॅगी झटपट तयार होत असल्यामुळे सगळ्यांच्या पसंतीस देखील पडते. त्याचप्रमाणे मॅगी ही वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येते. काहींना मॅगी ही तिखट मसाल्याची आवडते. तर काहींना अंड घालून तयार केलेली मॅगी आवडते. तसेच काहींना टोमॅटो, कांदा आणि मटार टाकून सँडवीच केलेली मॅगी आवडते. मात्र, एका महिलेने एक मॅगी रेसिपी तयार केली आहे. जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या मॅगीची रेसिपी पाहून लोक देखील हैराण झाले असून या रेसिपीला ट्रॉल करण्यात आले आहे.

अशी तयार करण्यात आली मॅगी

ही मॅगी दुधापासून तयार करण्यात आली आहे. या महिलेने मॅगी तयार करताना १ ग्लास दूध आणि अर्धा ग्लास पाणी टाकून त्यात कच्ची मॅगी टाकली आहे. त्यानंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्या कुसकरुन टाकल्या आहेत. त्यानंतर त्यात गोडवा येण्यासाठी कंडेंस्ड मिल्क दोन चमचे घालून दोन मिनिटात स्विट् मॅगी तयार केली आहे.

- Advertisement -

Desi Gooner नावाच्या ट्विटर यूजरने या रेसिपीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्या मॅगी रेसिपीला ‘मॅगीची बेस्ट रेसिपी’ अशी कॅप्शन देखील दिली आहे. हा व्हिडिओ ३ हजार लोकांनी लाइक केला असून ९४९ लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. तसेच लोकांनी या रेसिपीला मजेदार अशा प्रतिक्रिया दिल्या असून ज्या वाचल्यावर कुणालाही पोट धरुन हसू येईल.

- Advertisement -


हेही वाचा – अबब! इंग्लंडमधील ३५ कोटी…१८ कॅरेट… सोन्याचं कमोड गेलं चोरीला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -