सिग्नल तोडला, पण ‘चांद्रयाना’ची पावती फाडणार नाही – नागपूर पोलीस

Mumbai
Won't challan you for breaking signal: Nagpur Police to Vikram Lander. Internet loves it
सिग्नल तोडला, पण 'चांद्रयाना'ची पावती फाडणार नाही - नागपूर पोलीस

चांद्रयान २ मोहिमेच्या अंतिम टप्प्यामध्ये लँडर विक्रम चंद्रावर उतरण्यास अवघे २.१ मिनिटे बाकी असताना इस्त्रोच्या जमिनीवरून लँडरच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. हा संपर्क जोडण्यासाठी इस्त्रोकडून पुढच्या १४ दिवसांमध्ये लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी सोमवारी एक मजेशीर टि्वट केलं आहे. सध्या हे टि्वट सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे.

नागपूर शहर पोलिसांच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरून हे टि्वट केलं आहे. या टि्वटमध्ये असं लिहिलं आहे की, ‘प्रिय विक्रम, कृपया करून प्रतिसाद द्या. तुम्ही सिग्नल तोडल्याबद्दल आम्ही तुमच्या कडून पावती फाडणार नाही आहोत’, असं मजेशीर टि्वट नागपूर पोलिसांनी केलं आहे. या टि्वटला १ मिनिटात ७ हजार ५०० लाईक्स आणि २ हजार ४०० पेक्षा जास्त रिटि्वट केलं आहे.

तसंच इस्त्रोने सोमवारी एका इंडिया टुडेच्या वृत्तानुसार चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरने हार्ड लँडिंग यशस्वीपणे केलं असून लँडर हे सुखरुप असल्याचे सांगितलं आहे. विक्रम लँडर हा फक्त एकाबाजूला झुकलेला आहे. तसंच संपूर्ण लँडर हे एकसंध आहे. त्याचे तुकडे झालेले नाही, असं देखील इस्त्रोने सांगितलं आहे.

हेही वाचाखुशखबर! सॉफ्ट लँडिंग न होऊनही ‘विक्रम लँडर’ सुखरुप

या संदर्भात नागपूर पोलिसांच्या या मजेशीर टि्वटला इंटरनेटवरून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका टि्वटर युझरने असं लिहिलं आहे की, ‘१३३ कोटी भारतीयांच्या आशा विक्रम लँडरशी जोडल्या गेल्या आहेत. हे खरंच आहे आणि तुमचं टि्वट हे विलक्षण आहे.’ तसंच नागपूर पोलिसांच्या या टि्वटमुळे अनेकांनी त्यांचे कौतुक देखील केलं आहे.