घरट्रेंडिंगWorld Book Day: इंटरनेटच्या युगात तरूणांनी पुस्तकांकडेच फिरवली पाठ

World Book Day: इंटरनेटच्या युगात तरूणांनी पुस्तकांकडेच फिरवली पाठ

Subscribe

अक्षरांच्या जगाची जाणीव करून देणार्‍या या चळवळीला या वर्षी एकूण १५ वर्षे पूर्ण होत आहेत.

आजकाल तरूणांमध्ये वाचनसंस्कृतीचा कमी होतांना दिसत आहे. तरूण पिढी कोणत्याच प्रकारचे साहित्याचे वाचन करत नाही, असा आक्षेप सतत पुस्तकप्रेमींकडून घेतला जातो. डिजीटलायझेशनच्या युगात तरूण मंडळी आपला सर्वाधिक वेळ हा सोशल मीडियावर घालवताना दिसते, तर काही तरूण ऑनलाईन पुस्तकांच्या खजिन्यातील साहित्याचे वाचन करताना दिसतात. तरूणांमध्ये वाचनाची आवड रूजावी, याकरिता शाळा-महाविद्यालयांच्या पातळीवरच तरूणांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. त्या अनुषंगाने लेखक-भेटी, मुलाखती, वाङ्मयीन कार्यक्रम यांचं सातत्याने आयोजन करायला हवे. हल्लीचे तरुण मोबाइल, नेट सॅव्ही असल्याने पुस्तकं मोबाइल-बुक, इ-बुक या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने कोणते साहित्य आवर्जून वाचावे, याचे योग्य मार्गदर्शन तरूणांना पुस्तकप्रेमींनी करावे. पुस्तक दिन हा वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय अपुर्णच आहे, म्हणता येईल.

- Advertisement -

इंटरनेटच्या युगात तरूणांनी पुस्कांकडे पाठच फिरवलेली दिसते. सध्या कोणताही शब्द, त्याचा अर्थ अडला की google it केले जाते, त्यामुळे अनेक शंकाचे निरसन काही क्षणात होते. बऱ्याच तरूण मुलांना पुस्तकांचे वाचन करणे हे कंटाळवाणे वाटते. त्यामुळे वाचनाकडे तरूणाईचा कल कमी झालेला दिसतो. खरंतर आज जागतिक पुस्तक दिनांच्या निमित्ताने ही सगळी चर्चा…

२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर यांचा जन्म आणि मृत्यू झाला होता. याच दिवसाला पुस्तक दिन असे म्हटले जाते. आज जागतिक पुस्तक दिनासोबत कॉपीराईट दिन देखील जगभर साजरा केला जात आहे. युनेस्कोतर्फे दरवर्षी २३ एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा १९९५ मध्ये या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अक्षरांच्या जगाची जाणीव करून देणार्‍या या चळवळीला या वर्षी एकूण १५ वर्षे पूर्ण होत आहेत. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी, म्हणून या दिवसाचे आयोजन सर्वत्र केले जाताना दिसते. तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहेच. वाचनानं माणसाचं जीवन समृद्ध होतं. नव्या जगाची ओळख, आव्हानं स्वीकारण्याची प्रेरणा असं बरंच काही पुस्तकं आपल्याला देत असतात.

- Advertisement -

वाचनाने महत्व

  • वाचनामुळे मेंदुला चालना मिळते नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते.
  • वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते. वाचनाने शब्द संपत्ती वाढते.
  • लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितलेख, कविता या विषयी माहिती मिळते. आपल्या सामान्य ज्ञानात भर पडते.
  • आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. ज्यामुळे, वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.

आवर्जून वाचण्यासारख्या मराठी भाषेतील काही लेखकांची यादी 

  • श्री . विष्णु वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)
  • श्री . प्रल्हाद केशव अत्रे (आचार्य अत्रे)
  • श्री . पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु.ल.)
  • श्री . गोपाळ गणेश आगरकर
  • श्री . मंगेश केशव पाडगावकर
  • श्री . वामनदादा सदाजी कर्डक
  • श्री . पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी)
  • श्री . गंगाधर गोपाळ गाडगीळ
  • श्री . भालचंद्र वनाजी नेमाडे
  • श्री . वसंत पुरूषोत्तम काळे ( व . पु .काळे )
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -