World Emoji Day: हे इमोजीस तुमच्या आयुष्यात ‘स्माईल’ आणतात!

डिजिटल संस्कृतीचा एक भाग बनला असून इमोजी आता संवाद साधण्याचा नवा मार्ग बनत आहे

Mumbai

डिजीटल विश्वात जगत असताना खऱ्या-खुऱ्या संवादापेक्षा हल्लीची तरूणाई इमोजींना अधिक महत्त्व देताना दिसते. त्यामुळे या इमोजीचे बंध भावनांबरोबर जोडल्याचे दिसते. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अनेक प्रकारच्या इमोजी वापरल्या जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असताना या सगळ्या प्रकारच्या इमोजी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच जणू बनल्या आहेत. या स्माईलीज म्हणजेच इमोजी आपल्या आयुष्यात खरा आनंद आणत असतात.

१७ जुलै: ‘जागतिक इमोजी दिवस’ 

१७ जुलै रोजी संपुर्ण जगात ‘जागतिक इमोजी दिवस’ साजरा केला जातो. याच दिवसाच्या निमित्ताने भारतातील युजर्स कोणत्या इमोजीचा सर्वाधिक वापर करतात याचा खुलासा केला आहे. भारतात आनंदाचे अश्रू येणारा आणि ब्लोईंग किसचा इमोजी सर्वाधिक वापरला जातो. व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मजा, मस्करी, राग, प्रेम यांसारख्या भावना व्यक्त करायच्या असल्यास इमोजी सर्रास वापरल्या जातात.

इथून झाली इमोजीची सुरूवात

इमोजीची सुरूवात १९९० साली झाली होती. सर्वात आधी अॅप्पल कंपनीने आपल्या आयफोनच्या कीबोर्डमध्ये इमोजीचा समावेश केला होता. जागतिक इमोजी दिनाचे औचित्य साधत २०१५ साली पॅप्सीने पॅप्सीची इमोजी जारी केला होता.

ही इमोजी भारतात सर्वांची लाडकी

‘बोबल एआई’ या टेक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात आनंदाचे अश्रू येणारा आणि ब्लोईंग किसचा इमोजी सर्वाधिक वापरला जात असून या दोन इमोजींना भारतीयांची सर्वाधिक पसंती आहे. तर टॉप १० इमोजींमध्ये स्माइलिंग फेस विद हार्ट, किस मार्क, ओके हँड, लाऊडली क्राईंग फेस, बीमिंग फेस विद स्माइलिंग आइज, थम्स अप, फोल्डेड हँड्स आणि स्माइलिंग फेस विद सनग्लासेस यांचा समावेश आहे.

त्यामुळे, इमोजी हळूहळू आपल्या डिजिटल संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला असून संवाद साधण्याचा हा एक नवा मार्गच आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.