Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर ट्रेंडिंग जगातील पहिलं सोन्याचं हॉटेल; एक रात्र राहण्यासाठीचं भाडं ऐकून व्हाल थक्क!

जगातील पहिलं सोन्याचं हॉटेल; एक रात्र राहण्यासाठीचं भाडं ऐकून व्हाल थक्क!

जाणून घ्या, या भव्य सोन्याच्या हॉटेल विषयी...

Vietnam

व्हिएतनामची राजधानी हनोई येथे जगातील पहिले सोन्याचे हॉटेल उघडले आहे. येथे दारे, कप, टेबल, खिडक्या, नळ, वॉशरूम, जेवणाची भांडी ही सर्व सोन्याची आहेत. या हॉटेलचा शुभारंभ २ जुलै रोजी म्हणजे गुरुवारी करण्यात आला. या हॉटेलचे नाव Dolce Hanoi Golden Lake असे आहे. या हॉटेलमध्ये गेटपासून कॉफी कपपर्यंत सर्व वस्तू सोन्याच्या बनवलेल्या आहेत, असे सांगितले जात आहे. हॉटेल स्टाफचा ड्रेस कोडही लाल आणि सोन्याच्या रंगाचा ठेवण्यात आला आहे. लॉबीमध्ये फर्निचर आणि फर्निचरमध्ये देखील सोन्याची कारीगरी आहे. जेणेकरून संपूर्ण हॉटेल सोन्याचे दिसू शकेल.

हे पंचतारांकित हॉटेल असून ते २५ मजल्यांचे आहे. या हॉटेलमध्ये ४०० खोल्या आहेत. हॉटेलच्या बाहेरील भिंतींवर सुमारे ५४ हजार चौरस फूट सोन्याचे प्लेट्स टाईल्स बसविण्यात आल्या आहेत. यासह बाथटब, सिंक, शॉवर ते वॉशरूमपर्यंतचे सर्व सामान सोन्याचे आहेत. बेडरूममध्ये फर्निचर आणि फर्निचरवरही गोल्ड प्लेटिंग केले गेले आहे.

छतावर इन्फिनिटी पूल बांधलेला आहे. येथून हनोई शहराचे सुंदर दृश्य दिसते. इथल्या छताच्या भिंतींमध्येही गोल्ड प्लेटेड विटा वापरण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी या हॉटेलमध्ये अनेकांनी हजेरी लावली. त्याच्या भिंतींना देखील सोन्याच्या मुलामा देण्यात आलेला आहे.

या हॉटेलचे बांधकाम २००९ मध्ये सुरू झाले. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर फ्लॅटही बांधले गेले आहेत. जर एखाद्याला स्वत: साठी फ्लॅट घ्यायचे असतील तर ते ते घेऊ शकतात. या हॉटेलला आग्नेय आशियातील सर्वात लक्झरी हॉटेलची पदवी देण्यात आली आहे. होआ बिन ग्रुप एंड विनधम ग्रुपने एकत्र येऊन हे तयार केले आहे.

असे म्हणतात की, सोनं तुमचा मानसिक ताण कमी होण्यास मदत करतं. जेणेकरून आपण रिलॉक्स राहू शकतो. म्हणूनच हॉटेल मॅनेजमेंटने गोल्ड प्लेटिंगचा इतका वापर केला आहे. डबल बेडरूमध्ये एक रात्रीचा मुक्काम करणं सुमारे ७५ हजार रुपये आहे. त्याचबरोबर हॉटेलच्या खोल्यांमध्ये राहण्याचे सुरवातीचे भाडे सुमारे २० हजार रुपये आहे.

या हॉटेलमध्ये एक गेमिंग क्लब देखील आहे जो २४ तास खुला असतो. येथे कॅसिनो आणि पोकरसारखे गेम आहेत. जिथे आपण जिंकल्यानंतर पैसे देखील मिळवू शकतो.


दहा फुटाच्या मगरीला ठार मारून झाडाला लटकवलं, मांस गावभर वाटलं