आज आहे World Rose Day, पण का साजरा करतात हा दिवस? वाचा

जाणून घ्या, २२ सप्टेंबर रोजी world rose day साजरा करण्यामागचं कारण...

फेब्रुवारी म्हणजेच रोझ डेपासून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते. या दिवशी आपल्या जोडीदाराला गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त केले जाते. फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ वीकमध्ये असणाऱ्या ‘रोज डे’ विषयी सगळ्यांना माहितीच असेलच. पण या व्यतिरिक्त २२ सप्टेंबर रोजी देखील ‘वर्ल्ड रोझ डे’ साजरा केला जातो हे फार मोजक्या लोकांना माहित असावं. या दिवशी कर्करोगग्रस्तांना गुलाबाची फुले दिली जातात. या दिवशी त्यांना गुलाबाचे फुल देण्यामागचे कारण थोडे वेगळे असते. जेणेकरून त्यांचे मनोबल वाढेल आणि पुन्हा जीवन जगण्याची आशा त्यांच्यात निर्माण होईल.

अशी झाली या दिवसाची सुरूवात

कॅनडामधील १२ वर्षाच्या मेलिंडा रोजच्या स्मरणार्थ World Rose Day साजरा केला जातो. या मुलीला १९९४ मध्ये केवळ १२ वर्षांची असताना कर्करोगासारखा गंभीर आजार झाला होता. त्यावेळी ती जीवन आणि मृत्यू यांच्यात झगडत होती. डॉक्टरांनीही आशा सोडली होती आणि कुटुंबाला सांगितले की, ती फक्त २ आठवडे जीवन जगू शकेल, परंतु या लहान मुलीने हार मानली नाही आणि जीवनाची लढाई जिंकली.

…म्हणून आज ‘त्यांना’ गुलाबाची फुलं दिली जातात

यानंतर मेलिंडा साधारण ६ महिने जगली, परंतु सप्टेंबर महिन्यात तिने जगाला निरोप दिला. या मुलीने ६ महिने आपल्या आजाराशी ज्या प्रकारे झुंज दिली. आणि ती मुलगी कर्करोगग्रस्तांसाठी एक उदाहरण बनली. म्हणूनच आज कर्करोगाच्या रुग्णांना म्हणजेच कर्करोगग्रस्तांना गुलाबाची फुले दिली जातात, जेणेकरून या गंभीर आजाराविरूद्ध लढण्यासाठी आवश्यक असणारे धैर्य, मनोबल त्यांच्यातीन वाढेल आणि ते त्यांची आयुष्यातील लढाई जिंकू शकतील.


Weather Alert: मुंबई, ठाणेसह काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता