अंगणवाडीतील लहान मुलांच्या खाऊत आढळले किटक!

अंगणवाडीत शिकायला जाणाऱ्या मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचे अनेकदा समोर आलं आहे.

indore
अंगणवाडी
अंगणवाडीतील लहान मुलांच्या खाऊत आढळले किटक!

मध्यप्रदेशातील एका अंगणवाडीत लहान मुलांच्या खाऊत किटक आढळले आहेत. ही धक्कादायक घटना इंदोर शहरातील देवास गावात घडली. या अंगणवाडीत मुलांच्या आहारात गुणवत्ता नसल्याचे अनेक तक्रारी येत होत्या. अंगणवाडीतील खाऊ खाल्ल्यामुळे काही मुलं आजारी पडल्याचे दिसून आलं. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांनी त्यांच्या मुलांना अंगणवाडीत शिकायला जाण्यास बंद केलं. हे लक्षात येताच एसडीएम विभागाचे अधिकारी, जीवनसिंह रजक चौकशीसाठी त्या ठिकाणी गेले. अंगणवाडीतील मुलांची उपस्थिती अतिशय कमी होती. याचं कारण शोधल्यावर त्यांना जे कळालं ते अतिशय धक्कादायक होतं.

अधिकारी, रजक अंगणवाडीतील मुलांची उपस्थिती पाहून थक्क झाले. चौकशीनंतर त्यांना कळाले की, या अंगणवाडीतील लहान मुलांन उत्तम आहार मिळत नाही. त्यामुळे काही मुलं आजारीही पडले आहेत, म्हणून त्यांचे पालक मुलांना अंगणवाडीत शिकायला पाठवत नसल्याचे त्यांना कळाले. रजक यांनी निरीक्षण दरम्यान स्वत: तेथील जेवण खाऊन पाहीलं. या जेवणात उत्तम गुणवत्ता नसल्याचे त्यांना जाणवलं. त्यानंतर त्यांनी स्थानिक खाद्य पुरवठा संस्थेला तातडीने भेट दिली. तेथील तांदूळ, बेसन इतर खाद्यपदार्थांचे निरीक्षण केलं. दरम्यान,अधिकारी रजक यांना तांदळात चक्क किटक दिसले. त्यानंतर रजक यांनी खाद्यपदार्थ संस्थेतील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here