Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग कुत्र्याची करामत पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल!

कुत्र्याची करामत पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल!

हल्ल्याच्या भीतीने मालकही झाला कावराबावरा

Related Story

- Advertisement -

पाळीव प्राणी हे नेहमीच अनेकांसाठी जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. अनेक जण पाळीव प्राण्यांना आपल्या लहान मुलांप्रमाणे सांभाळत अंगाखांद्यावर खेळवतात. त्यामुळे अनेकांच्या घरात आपण कुत्रा, मांजर प्राणी पाहतो. या प्राण्यांचे दुखण, खूपण पाहण्यापासून ते सर्व गोष्टी अनेक जण आवडीने करतात. या प्राण्यांना जरा जरी काय झाले तर मालकाचा जीव तुटतो. परंतु काही पाळीव प्राणी एखाद्या मस्तीखोर, खोटकर पोराप्रमाणे वागत असतात. त्यांचा असा मस्तीखोर स्वभाव अनेकांची मने जिंकणारा असतो परंतु हा मस्तीखोर स्वभाव एका मालकासाठी चांगलाच घाबरवून सोडणारा ठरला आहे. सोशल मिडियावर सध्या असाच एक व्यक्तीचा आणि त्य़ाच्या पाळीव श्वानाचा फोटो धुमाकूळ घालत आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये पाळीव खोटकर श्वानाने केलेल्या करामतीमुळे आपल्या मालकाला चांगलेच घाबरवून सोडले आहे. या फोटोतील श्वान घरात कोणी नसताना मस्तपैकी दंगा करत होता. मात्र, या मस्तीमध्ये श्वानाने केलेल्या करामती पाहून मालकाला वाटल की त्याने जीवाचे काही बरं वाईट तर केलं नाही ना. परंतु हा मालकाचा गैरसमज ठरला. कारण घरात कोणीही नसताना खेळता खेळता या श्वानाने किचनमध्ये जात जॅमची सगळी बाटली अंगावर ओतून घेतली आणि तशाच अवस्थेत तो किचनमध्ये झोपून राहिला. परंतु जेव्हा श्वानाचा मालक घरात आला आणि त्याने आपल्या श्वानाला जमिनीवर निपचित पडलेले पाहिले. तेव्हा त्याला वाटले की यावर कोणी हल्ला केला की काय? कारण त्याच्या अंगावर सांडलेला सॉस हे मालकाला क्षणासाठी रक्तच वाटले. आणि तो खूप घाबरला. परंतु थोड्यावेळानंतर हा श्वान उठला आणि मालकाला सगळा प्रकार लक्षात आला. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या खोटकर श्वानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका बाजूला तो जमिनीवर निपचित पडल्याचं दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने हळूच त्याची जीभ बाहेर काढून पोझ दिली आहे. त्याचा हा फोटो पाहून हा श्वान खरंच फार खट्याळ असल्याचं नेटकऱ्यांमध्ये म्हटलं जात आहे.

- Advertisement -